तरुण भारत

काश्मीरसंबंधी भारताची ओएचसीचआरवर टीका

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था

संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार संघटनेच्या अंतर्गत काम करणाऱया ओएचसीएचआर या गटाने नुकतेच काश्मीरमधील परिस्थितीविषयी भारतविरोधी वक्तव्य केले आहे. भारताचे या वक्तव्याचा समाचार घेतला असून हे वक्तव्य अज्ञानातून निर्माण झाल्याची टीका केली आहे. या गटाला जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा आव्हानांची कोणतीही जाणीव दिसत नाही, असे भारताने सुनावले.

Advertisements

या गटाने या प्रदेशातील स्थितीविषयी बिनबुडाची आणि निराधार विधाने केली आहेत. या विधानांमध्ये या भागातील कायदा आणि सुव्यव्यस्था यंत्रणेविषयी नकारात्मक भाषेत टिप्पणी केली आहे. भारताला सीमेपलिकडून केल्या जाणाऱया दहशतवादाला तोंड द्यावे लागते. या दहशतवादामुळेच मानवाधिकारांचे हनन होत आहे, कायदा-सुव्यवस्था यंत्रणेमुळे नव्हे, असे भारताने खडसावले आहे. ओएचसीएचआर (ऑफीस ऑफ द हाय कमिशनर ऑफ हय़ूमन राईटस्) हा गट पक्षपाती असल्याचे या व्यक्तव्यावरुन दिसून येते. त्याने भारताची बाजू हेतुपुरस्सर लक्षात घेतलेली नाही. भारत हे एक लोकशाही राष्ट्र असून त्याची मानवाधिकार आणि त्यांच्या संरक्षणावर पूर्ण निष्ठा आहे. म्हणूनच भारत सरकार दहशतवाद्यांपासून निरपराध जनतेचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलते, असे भारताच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी खडसावले.

Related Stories

दुसऱया लाटेत 1 कोटींहून अधिक जण बेरोजगार

Amit Kulkarni

दिल्ली : भाविकांसाठी उघडणार आजपासून अक्षरधाम मंदिर

Rohan_P

बेलारुसमध्ये निदर्शने सुरूच : स्थिती नियंत्रणाबाहेर

Patil_p

युपी प्लस योगी,बहुत है उपयोगी

Patil_p

ताशी 120 किमीने धडकणार निसर्ग वादळ

datta jadhav

कोळसा घोटाळाप्रकरणी माजी मंत्र्याला कारावास

Patil_p
error: Content is protected !!