तरुण भारत

दक्षिण आफ्रिका अ संघाला 100 धावांची आघाडी

ब्लोमफाऊंटन : भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर असून उभय संघात अनधिकृत कसोटी मालिका खेळविली जात आहे. येथे सुरू असलेल्या दुसऱया कसोटी सामन्यात गुरुवारी खेळाच्या तिसऱया दिवशी शेवटची बातमी हाती आली त्यावेळी यजमान दक्षिण आफ्रिका अ संघाने आपल्या दुसऱया डावात 1 बाद 74 धावा जमवित भारत अ संघावर 100 धावांची आघाडी मिळविली होती.

चार दिवसांच्या या अनधिकृत कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका अ संघाचा पहिला डाव 297 धावात आटोपला. जॉर्ज लिन्डेने 44 तर मार्को जेनसेनने 70 तसेच हमजाने 34 तर सलामीच्या इर्वेने 38 धावांचे योगदान दिले. स्टुरमनने नाबाद 27 धावा जमविल्या. भारत अ संघातर्फे नवदीप सैनी आणि ईशान पोरेल यांनी प्रत्येकी 3 तर नागवासवाला, सौरभ कुमार आणि बाबा अपराजित यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisements

संक्षिप्त धावफलक

द. आफ्रिका अ प. डाव- सर्वबाद 297 (जेनसेन 70, लिन्डे 44, इर्वे 38, व्हॅनटोनडेर 34, हमजा 31, क्वेसहिले 32, स्टुरमन नाबाद 27, सैनी 3-67, पोरल 3-49, नागासवाला, सौरभ कुमार, बाबा अपराजित प्रत्येकी 1 बळी), भारत अ प. डाव- सर्वबाद 276 (सर्फराज खान 71, ईशान किशन 49, हनुमा विहारी 54, पृथ्वी शॉ 42, पांचाळ 24, सौरभ कुमार 23, स्टुरमन 4-48, जेनसेन 3-44, सिपमला 1-74, लिन्डे 1-58), द. आफ्रिका दु. डाव- 19 षटकात 1 बाद 74 (इर्वे 41, मलान खेळत आहे 27, व्हनटोनडेर खेळत आहे 8, सौरभ कुमार 1-23) (धावफलक अपूर्ण).

Related Stories

बहरिन ग्रां प्रिमध्ये मर्सिडीजचा हॅमिल्टन विजेता

Patil_p

विदेशी प्रशिक्षण योजनेसाठी सावधगिरी बाळगा : आयओए

Amit Kulkarni

‘डीएलएस’ पद्धतीचे जनक टोनी लुईस यांचे निधन

Patil_p

इंग्लंड फुटबॉल संघाला पराभवाचा धक्का

Patil_p

पाकिस्तान-द.आफ्रिका दुसरी कसोटी आजपासून

Patil_p

भारताच्या ज्योती सुरेखा व्हेनामला सुवर्ण

Amit Kulkarni
error: Content is protected !!