तरुण भारत

डेव्हिस चषक टेनिस सर्बिया उपांत्य फेरीत

माद्रिद : डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत जोकोविचच्या शानदार कामगिरीच्या जोरावर सर्बियाने पाचव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. सर्बियाने डेव्हिस चषक लढतीत कझाकस्तानचा पराभव करून शेवटच्या चार संघात स्थान मिळविले.

2010 साली सर्बियाने डेव्हिस चषकावर आपले नाव कोरले होते. आता सर्बिया व क्रोएशिया यांच्यातील उपांत्य लढतीला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे.  उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत टॉप सीडेड जोकोविचने एकेरीच्या सामन्यात कझाकस्तानच्या बुबलिकचा 77 मिनिटांच्या कालावधीत 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली होती. डेव्हिस चषक स्पर्धेच्या इतिहासात गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत जोकोविचने एकेरीचा एकही सामना गमावलेला नाही.

Advertisements

Related Stories

सौरभ गांगुलीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Patil_p

रॉटरडॅम स्पर्धेतून नदालची माघार

Patil_p

टी-20 वर्ल्ड कपसाठी पंचांची घोषणा

Amit Kulkarni

मोईन अली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार

Patil_p

कोरोनाग्रस्त तेजस्विनीला दोन लाखांची मदत

Patil_p

कॅनडा-स्पेन यांच्यात जेतेपदासाठी लढत

Patil_p
error: Content is protected !!