तरुण भारत

महाराष्ट्राला सहाव्यांदा दुहेरी मुकुट

31 वी राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा

वृत्तसंस्था /उना (हिमाचल प्रदेश)

Advertisements

31 व्या राष्ट्रीय किशोर-किशोरी अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने उना, हिमाचल प्रदेश येथील इंदिरा गांधी स्टेडीयमवर इतिहास रचला. बुधवारी झालेल्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी कर्नाटकवर तर किशोरींनी पंजाबवर विजय मिळवत दुहेरी मुकुटासह अजिंक्यपद मिळवले. किशोर गटाने आतापर्यंत 10 वेळा तर किशोरी गटाने 15 वेळा विजेतेपदे पटकाविली आहेत. किशोर गटाने सलग 6 वेळा विजेतेपद कायम राखले आहे. झारखंड येथे मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत किशोरींना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. ती कटू आठवण या विजयाने पुसून काढली. या वेळी महाराष्ट्राला मिळालेले हे सहावे दुहेरी अजिंक्यपद आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू भरत पुरस्कार आशिष गौतमला तर ईला पुरस्कार सानिका चाफेला देऊन गौरवण्यात आले. 

अंतिम फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या किशोर संघाने कर्नाटकवर 10-06 असा एक डाव 4 गुणांनी विजय मिळवत कर्नाटकचा धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राने सुरवातीपासूनच कर्नाटकला डोके वर काढण्याची जराही संधी दिली नाही. महाराष्ट्राच्या आशिष गौतम (2ः10, 3ः10 मि. संरक्षण व 1 गडी),  जितेंद्र वसावे (2ः00, 1ः30 मि. संरक्षण), हाराद्या वसावे (1ः20, 2ः00 मि. संरक्षण व 2 गडी), अथर्व पाटील (नाबाद 1ः30 मि. संरक्षण) व मोहन चव्हाण (3 गडी) व कर्णधार सोत्या वळवी (2 गडी) व राज जाधव (2 गडी)  यांनी विजयात चमकदार खेळी केली. पराभूत कर्नाटकच्या प्रीथम (1ः10 मि. संरक्षण व 2 गडी), पी. गुरूबत (1 मि. संरक्षण व 1 गडी) व एल. व्ही. समर्थ (1ः10 मि. संरक्षण) यांनी केलेली खेळी त्यांना मोठय़ा पराभवापासून वाचवू शकली नाही. महाराष्ट्राचे संघ प्रशिक्षक प्रफुल्ल हाटवटे, व्यवस्थापक मंदार परब व फिजिओ डॉ. किरण वाघ यांनी हा सांघिक विजय असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राच्या किशोरींनी अंतिम फेरीच्या सामन्यात पंजाबला 11-03 असा एक डाव 8 गुणांनी धूळ चारली. या स्पर्धेतील  सर्व सामने डावाने जिंकले होते त्यात प्रशिक्षक मुंबईच्या एजाज शेख यांचा मोठा वाटा आहे. कोविड पार्श्वभूमीवर छोटे खेळाडू जवळजवळ दिड-दोन वर्षे मैदानात नव्हते. अशा वेळी खेळाडूंमध्ये समन्वय घडवणे व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांच्याकडून अप्रतिम कामगिरी करवून घेणे हे काम एजाज शेख यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले.

महाराष्ट्राची कर्णधार सानिका चाफे (5ः50, नाबाद 3ः10 मि. संरक्षण व 4 बळी), सुषमा चौधरी (नाबाद 1ः10, 2ः50 मि. संरक्षण व 1 बळी), धनश्री कंक (1ः00 मि. संरक्षण) व अंकिता देवकर (4 बळी), धनश्री करे (1 बळी), समृध्दी पाटील (1 बळी) यांनी महाराष्ट्राच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी केली.

Related Stories

यू-19 आशिया चषक आठव्यांदा भारताकडे

Patil_p

मरे, क्लिस्टर्स यांना वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश

Patil_p

टी-20 : न्यूझीलंड-विंडीज आज आमनेसामने

Patil_p

भारताची सात पदके निश्चित

Patil_p

भारतीय डेव्हिस संघातील बोपण्णाला स्थान

Patil_p
error: Content is protected !!