तरुण भारत

भारत, फ्रान्स उपांत्य फेरीत, बेल्जियम पराभूत

कनिष्ठ विश्वचषक हॉकी

वृत्तसंस्था /भुवनेश्वर

Advertisements

विद्यमान विजेत्या भारताने बलाढय़ बेल्जियमचा एकमेव गोलने पराभव करून कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. याशिवाय जर्मनी, अर्जेन्टिना, फ्रान्स यांनीही शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. शुक्रवारी भारताची उपांत्य लढत जर्मनीशी तर अर्जेन्टिनाची लढत फ्रान्सशी होणार आहे.

2016 मध्ये लखनौमध्ये झालेल्या मागील स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेतील ते वर्चस्व भारताने या सामन्यातही कायम राखले. शारदानंद तिवारीने एकमेव विजयी गोल 21 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर नोंदवला. या सामन्यात दोन्ही संघांनी भक्कम बचावाचे दर्जेदार प्रदर्शन केले. पण भारताने केवळ एका संधीचा पुरेपूर लाभ उठवित बाजी मारली.

प्रारंभापासून आक्रमक खेळणाऱया बेल्जियमने पहिल्या काही मिनिटांत भारतावर बराच दबाव आणला होता. पण भारतीय बचावफळीने कोणतेही दडपण न घेता त्यांचे प्रयत्न थोपवण्यात यश मिळविले. 13 व्या मिनिटाला बेल्जियमला पहिली संधी मिळाली होती. पण गोलरक्षक प्रशांत चौहानने अप्रतिम बचाव करीत त्यांची ही संधी वाया घालवली. पहिले सत्र संपण्याच्या सुमारास उत्तम सिंगने भारताला पहिली संधी मिळवून दिली. पण त्याचा फटका गोलरक्षक बोरिस फेल्डहीमने अचूक अडवला. भारताने दुसऱया सत्रातील सहाव्या मिनिटाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर गोलकोंडी फोडत पहिले व एकमेव यश मिळविले. शारदानंद तिवारीने हा गोल नोंदवला. भारताने अखेरपर्यंत ही आघाडी टिकवून ठेवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

अन्य एका सामन्यात फ्रान्सने मलेशियाचा 4-0 असा एकतर्फी धुव्वा उडवित उपांत्य फेरी गाठली. चारही गोल त्यांनी पेनल्टी कॉर्नर्सवर नोंदवले. तिमोथी क्लेमेंटने हॅट्ट्रिक (14, 24, 60 वे मिनिट) नोंदवली तर मथिस क्लेमेंटने 31 व्या मिनिटाला एक गोल नोंदवला.

हॉकी : कॅनडा, चिलीचे विजय

एफआयएच कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत गुरुवारी 13 ते 16 व्या क्रमांकासाठी झालेल्या वर्गवारी सामन्यात कॅनडाने अमेरिकेचा, चिलीने इजिप्तचा पराभव केला.

कॅनडाने तीन पेनल्टी कॉर्नर्सवर गोल नोंदवत अमेरिकेवर 4-0 असा विजय मिळविला. ख्रिस्तोफर टर्डिफ (20 वे मिनिट), अलेक्झांडर बर्ड (25), फ्लीन मॅकुलोश (38) यांनी पेनल्टी कॉर्नर्सवर गोल केले तर 52 व्या मिनिटाला बर्डने वैयक्तिक दुसरा गोल पेनल्टी स्ट्रोकवर नोंदवला. अन्य एका सामन्यात चिलीने इजिप्तवर एकमेव गोलने विजय मिळविला. रायमुंडो व्हॅलेन्झुएलाने एकमेव मैदानी गोल नोंदवला. आता कॅनडा व चिली यांच्यात 13 व 14 व्या क्रमांकासाठी शनिवारी लढत होणार आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान, पोलंड-दक्षिण कोरिया यांच्यात 9 ते 12 व्या क्रमांकासाठी लढती होणार आहेत.

Related Stories

धोनीने वर्ल्डकपनंतर निवृत्त होणे योग्य ठरले असते

Patil_p

अंकिता रैनाची विजयी सलामी

Patil_p

…बडोदा संघाच्या प्रशिक्षकपदी व्हॅटमोर

Patil_p

टी-20 मानांकनात शफालीचे अग्रस्थान कायम

Amit Kulkarni

मुंबई सिटीचा ईस्ट बंगालवर दिमाखदार विजय

Patil_p

रियल माद्रिद संघात बेंझेमाचे पुनरागमन

Patil_p
error: Content is protected !!