तरुण भारत

दक्षिण अफ्रिकेतून मुंबईत आलेले ९ प्रवासी पॉझिटिव्ह

मुंबई/प्रतिनिधी

जग कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडत असताना पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा शिरकाव झाल्याने संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या या नव्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचा भारतात शिरकाव झाला आहे. आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोन रुग्णांना ओमिक्रॉन व्हेरिअंटची लागण झाल्याचे समजल्यानंतर कर्नाटकसह महाराष्ट्राची चिंता वाढली होती. तसेच या दोन रुग्णांच्या संपर्कात आलेले ५ जण पॉझिटिव आल्याने कर्नाटक सरकारची धास्ती वाढली आहे. त्यातच आता महाराष्ट्रालाही ओमिक्रॉन व्हेरिअंटचा धोका असल्याचे दिसत आहे. मुंबई महानगर पालिकेने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार आफ्रिकेतून आलेले तब्बल ९ प्रवासी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.

नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या दक्षिण आफ्रिकेतील एका प्रवाशासह 9 आंतरराष्ट्रीय प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आलेत. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता या रुग्णांना ओमिक्रॉनची बाधा झाली की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Advertisements

Related Stories

कोटक महिंद्रा सीईओ यावर्षी फक्त एकच रुपया पगार घेणार!

prashant_c

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी नौसेनेची मेडिकल टीम मैदानात

datta jadhav

कर्नाटकात गेल्या २४ तासात २ हजार २४१ रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी खर्च करणार दरवर्षी अडीच हजार कोटी

Rohan_P

पर्यावरण रक्षणासाठी पालिकेचा नवा उपक्रम

Patil_p

सांगली : लेखक-कवी,गिर्यारोहक आपल्या भेटीला, मराठी अध्यापक संघाचा उपक्रम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!