तरुण भारत

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक शिवसेना ताकदीने लढणार

शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisements

अखेरच्या दिवशी शिवसेनेकडून पतसंस्था संस्था गटातून उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, शिव-सहकार सेना जिल्हा संघटक संजय जाधव व मागासवर्गीय गटातून सुरेश कामरे यांच्यासह २५ अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा बँक निवडणूक शिवसेना ताकदीने लढणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिली. ते म्हणाले, जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला व एकूणच सर्वसामान्य माणसाच्या हक्काचं आर्थिक केंद्र असल्याने शिवसेना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. तसेच शिवसेनेतर्फे जिल्हा बँक निवडणुकीसाठी जवळपास सर्वच गटातून सुमारे २५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाचं हित, त्यांचा सर्वांगिण विकास व तळागाळातील माणसाला स्वावलंबी बनवण्याचे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून होऊ घातलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणूकीत शिवसेना ताकदीनिशी उतरत आहे. जिल्ह्यातील आम्ही सर्व शिवसैनिक निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, अशी माहितीही जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिली.

यावेळी तालुकाप्रमुख आनंदा शेट्टी, इचलकरंजी शहरप्रमुख सयाजी चव्हाण, शिव-सहकार सेना हातकणंगले तालुका संघटक संदीप दबडे, किरण पडवळ, महेश बोहरा, आप्पासो पाटील, बाळासाहेब थोरवत, संजय वाईंगडे, अर्जुन मुरलीधर जाधव, भरत देसाई, ऋषिकेश गौड, दत्ता साळुंखे, अजय घाटगे यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

कोरोना : दिल्लीत मागील 24 तासात 3,231 नव्या रुग्णांची नोंद ; 233 मृत्यू

Rohan_P

कोल्हापूर अन् सातारची गादी एकच

Abhijeet Shinde

देशात सलग चौथ्या दिवशी 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण

datta jadhav

मास्कसाठी कायदा करणारे ‘राजस्थान’ देशातील पहिले राज्य : अशोक गेहलोत

Rohan_P

गारगोटी पोलीस ठाण्यातील पो. ह. महादेव आबीटकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Abhijeet Shinde

कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक लोकसभेत चर्चेविना मंजूर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!