तरुण भारत

कर्नाटक : मुख्यमंत्र्यांची ‘ओमिक्रॉन’वर चर्चेसाठी उच्चस्तरीय बैठक

बेंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये कोरोनाव्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराची दोन प्रकरणे आढळून आल्यामुळे, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आज शुक्रवारी बेंगळूर येथे एका उच्चस्तरीय बैठकीत या विषयावर चर्चा केली. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री आणि इतर आरोग्य अधिकारी उपस्थित आहेत.

केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले की, कर्नाटकमध्ये कोरोनाव्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराची दोन प्रकरणे आढळून आली असून त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता परंतु कोविड-नियमाचे योग्य ते पालन करण्यास सांगितले आहे. तसेच विलंब न करता लसीकरण करण्यास सांगितले. दोन्ही रुग्ण 66 वर्षे आणि 46 वर्षे वयोगटातील पुरुष असून त्यांच्यात सौम्य लक्षणे आहेत. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याने नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले की, या रुग्णामध्ये अजूनतरी गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत.

Advertisements

Related Stories

दूधगंगा उजव्या कालव्यात पडला दहा गव्यांचा कळप

Abhijeet Shinde

देशात बाधितांचा आकडा 31 लाखांवर

Patil_p

कोयने’ची दारे १० फुटांवर उघडली, प्रतिसेकंद ५५ हजार क्युसेक विसर्ग सुरु

Abhijeet Shinde

तरूण भारतमुळे वारांगनाना मिळाली मदत

Patil_p

म्हासुर्ली परिसरात वन तस्करांकडून चोरटी वृक्षतोड ; वन – सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष

Abhijeet Shinde

कोकण रेल्वे तर्फे ‘स्वच्छता पखवाडा’

GAURESH SATTARKAR
error: Content is protected !!