तरुण भारत

बुद्धिबळपटू वैभव जोशी, नरेंद्र अग्रवाल यांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त

सांगली/प्रतिनिधी

सांगलीतील बुद्धिबळ खेळाडू वैभव जोशी आणि पश्चिम बंगालचा बुद्धिबळपटू नरेंद्र अग्रवाल यांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले. सध्या हे दोघेही सांगलीमधील बुद्धिबळ प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित आणि सारंग विवेक पुरोहित यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने बुद्धिबळ प्रशिक्षण घेत आहेत.

हैद्राबाद ऑल इंडिया फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दार्जिलिंगचा नरेंद्र अग्रवाल याने यश संपादन केले. तो ७ वर्षांखालील वयोगटात सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या स्पर्धेमध्ये नरेंद्र याने ५ गुण संपादन केले. याच बुद्धिबळ स्पर्धेमध्ये त्याला आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले. तर पुणे येथे झालेल्या ऑल इंडिया फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सांगलीच्या वैभव यास आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले. वैभव हा अभियंता असून तो एका नामांकित कंपनीत नोकरी करत आहे. त्याच बरोबरीने खेळाची आवड सुद्धा जोपासत आहे. वैभव आणि नरेंद्र हे खूपच चांगले बुद्धिबळ खेळाडू आहेत. भविष्यामध्ये सुद्धा ते खेळामध्ये सातत्य राखून याच प्रकारे चांगले प्रदर्शन करतील, असा विश्वास प्रशिक्षक श्रेयस पुरोहित यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisements

Related Stories

सांगलीला महापूराचा धोका, अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवणार

Abhijeet Shinde

महामार्गावर वाघवाडी येथे कोकेन बाळगणारा परदेशी तरुण जेरबंद

Abhijeet Shinde

मिरजेतील डि मार्ट मॉलला 20 हजारांचा दंड

Abhijeet Shinde

‘तीन टीएमसी पाणी दिल्यास तात्पुरती योजना राबवू’

Abhijeet Shinde

सागंली : पलूस नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर

Abhijeet Shinde

मिरजेतील डॉक्टराला कोरोनाची लागण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!