तरुण भारत

टूथब्रश बांबूचा, चहाचा कपही बांबूचा

सकाळी उठल्याबरोबर दोन वस्तूंचा उपयोग केल्याशिवाय आपण राहात नाही. एक म्हणजे टूथब्रश आणि दुसरा चहाचा कप! बहुतेकांची सकाळ या दोन वस्तूंपासूनच सुरू होते. टूथब्रश प्लास्टीकचा असतो तर काही वेळा कप किंवा मगही अशाच प्रकारचा असतो. प्लास्टीक पर्यावरणाला धोकादायक आहे. त्यामुळे प्लास्टीकच्या वस्तूंच्या जागी पर्यावरणस्नेही साधनासामग्रीचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तू वापराव्या, असा सध्याचा कल आहे.

हाच कल ओळखून पुण्यातील सूरज सैंद यांनी बांबूच्या तंतूपासून टूथब्रश बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. तसेच बांबूपासून चहा किंवा कॉफीचे मग तयार करण्याचे कौशल्यही आत्मसात केले आहे. सूरज सैंद यांनी 2015 मध्ये इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून 2017 मध्ये ब्रिटनमधून व्यवस्थापनाचे शिक्षणही घेतले आहे. काही काळ ब्रिटनमध्येच नोकरी केल्यानंतर ते 2019 मध्ये भारतात परत आले आहेत. त्यांनी पुण्यात बांबूच्या उपयुक्त वस्तू बनविण्याची स्टार्टअप कंपनी सुरू करून एक वर्षाच्या कालावधीत दहा लाखाची उलाढाल साध्य केली आहे. कोरोनाकाळात लोक पर्यावरणाविषयी जास्त जागरुक झाले. त्याचा लाभ त्यांना मिळाला. पर्यावरणस्नेही बांबूचे टूथब्रश आणि चहा-कॉफीचे मग यांना चांगली मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या जीवनातून प्लास्टीकला हद्दपार करणे या ध्येयाने ते प्रेरित झाले आहेत. त्यामुळे प्लास्टीकच्या जास्तीत जास्त वस्तूंच्या जागी बांबू किंवा तत्सम नैसर्गिकरीत्या डिग्रेडेबल असणाऱया साधनांचा वापर करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. टूथब्रश आणि मगबरोबरच बांबूच्या अन्य नित्योपयोगी वस्तू ते तयार करतात.

Advertisements

Related Stories

मिझोराममध्ये भूकंपाचे धक्के

datta jadhav

मुलांना धोका असल्याचा पुरावा नाही !

Patil_p

आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार योजनेचा प्रारंभ

Patil_p

राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न

datta jadhav

चीनने पुन्हा दाखविले क्रौर्य

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफला मोठे यश

Patil_p
error: Content is protected !!