तरुण भारत

बिहारमध्ये सापडले सर्वात मोठे सुवर्णभांडार

बिहार हे राज्य भारतातील अत्यंत गरीब राज्यांमधील एक म्हणून समजले जाते. येथील लोकसंख्या प्रचंड आहे, पण उत्पन्नाची साधने किमान आहेत. त्यामुळे बरेच बिहारी पोटासाठी मातृराज्य सोडून अन्यत्र गेलेले आहेत. तथापि, हेच गरीब बिहार राज्य भारताच्या श्रीमंतीला कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत.

याचे कारण असे की, भारतातील सर्वात मोठय़ा सोन्याच्या खाणी बिहारमध्ये आढळून आल्या आहेत. या राज्यातील पश्चिम चंपारण्य हा जिल्हा सुवर्णभूमी म्हणून नाव कमावेल, अशी शक्मयता निर्माण झाली आहे. येथे भूवैज्ञानिकांनी नुकतेच व्यापक सर्वेक्षण केले असून या जिल्हय़ाच्या काही भागांमध्ये सोन्याच्या खाणी आढळल्या आहेत. या भागात एकंदर 250 टन सोने धातू स्वरुपात सापडू शकते, असा संशोधकांचा विश्वास आहे. आजच्या हिशोबात याची एकंदर किंमत अब्जावधी इतकी प्रचंड होते. या राज्याच्या जमुई जिल्हय़ातही 37 टन सुवर्णक्षार सापडण्याची शक्मयता आहे. गया आणि रोहतास या जिल्हय़ांमध्येही मौल्यवान धातूंचे भांडार असल्याची शक्मयता व्यक्त होत आहे.

Advertisements

Related Stories

उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राजेंद्र प्रताप सिंह यांना कोरोनाची लागण

Rohan_P

छत्तीसगड : राजधानी रायपूरमध्ये 9 ते 19 एप्रिल दरम्यान पूर्ण लॉकडाऊन!

Rohan_P

शिक्षणासोबत शालेय मुलांची प्रकृतीही सुधारणार

Patil_p

आयटी रिटर्न सादर करण्याचा कालावधी 30 सप्टेंबरपर्यंत

Amit Kulkarni

लसीकरणात भारत तिसऱया क्रमांकावर

Patil_p

एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 1 लाख 41 हजार कोटींवर

Patil_p
error: Content is protected !!