तरुण भारत

पेट्रोल-डिझेल प्रदूषण संपवणारा मित्र जिवाणू

कानपूर येथील डॉ. आंबेडकर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर हँडीकॅप्ड या संस्थेच्या काही विद्यार्थ्यांनी पेट्रोल आणि डिझेलमुळे होणारे वायुप्रदूषण संपविण्यासाठी महत्त्वाचे शोधकार्य केले आहे. त्यांचा शोध बायोटेक रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये सादर केला गेला आहे. या विद्यार्थ्यांनी एका पर्यावरणस्नेही जिवाणूचा शोध लावला असून हा जिवाणू पेट्रोल आणि डिझेल जाळण्यानंतर निर्माण होणारे घातक आणि विषारी वायु खाऊन पचवून टाकतो. हेच जिवाणू पेट्रोल-डिझेलच्या ज्वलनातून निर्माण होणाऱया विषारी वायुंचे रूपांतर रसायनरहित डिटर्जंटमध्ये (बायो सफेक्टटंट) असेही दिसून आले आहे.

पेट्रोलियम पदार्थांच्या ज्वलनामुळे केवळ हवेत प्रदूषण वाढते असे नाही तर जमीन आणि पाणीसुद्धा प्रभावित होते. या विद्यापीठाचे विद्यार्थी शैलजा तिवारी आणि सृष्टी बरनवाल यांच्या पुढाकाराने हे संशोधन करण्यात आले. इतरही विद्यार्थ्यांनी त्यांना साहाय्य केले. ‘लोहा लोहे को काटता है’ या तत्वानुसार निसर्गातीलच काही तत्वांचा उपयोग करून निसर्गातील पदार्थ जे प्रदूषण निर्माण करतात त्यांचा नायनाट करणे हे या संशोधनाचे प्रमुख सूत्र आहे. या शोधाचे व्यापारीकरण शक्मय झाल्यास संपूर्ण जगाला प्रदूषणापासून वाचविण्याचा एक महत्त्वाचा मार्ग उपलब्ध होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे संशोधन करण्यात आले, असे शैलजा यांनी स्पष्ट केले. पेट्रोलियम पदार्थांच्या ज्वलनातून निर्माण होणारे उपपदार्थ तसेच विषारी वायुंचे रूपांतर उपयुक्त वस्तूंमध्ये करण्याची क्षमता असणारे हे जिवाणू भविष्यकाळात सर्वांनाच उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisements

Related Stories

देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘या’ स्थानी

Rohan_P

सौराष्ट्र-कच्छ येथे 6 तासांमध्ये 10 वेळा जाणवले भूकंपाचे धक्के

Patil_p

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक

Amit Kulkarni

छेडछाडीदरम्यान दुर्घटनेत विद्यार्थिनीचा मृत्यू

Patil_p

पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 60 पैसे वाढ

Patil_p

शेतकरी आंदोलनावर राज्यसभेत चर्चा

Patil_p
error: Content is protected !!