तरुण भारत

नेसरीत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना रक्तदान शिबिर संपन्न

नेसरी / वार्ताहर

येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्त युवासेना प्रमुख आदित्य जी ठाकरे यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.त्यानिमित्ताने नेसरी येथील युवासेना शाखेच्या वतीनेही मसनाई मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना संघटक संग्रामसिंह कुपेकर, प्रकाश दळवी यांनी शिबिराला भेट दिली. तसेच नेसरी पोलीस ठाण्याचे सपोनि अविनाश माने, युवासेना जिल्हा अधिकारी दिनेश कुंभीरकर, शिवसेना माजी उपतालुका प्रमुख विलासभाई हल्याळी, नेसरी शिवसेना शहरप्रमुख प्रकाश मुरकुटे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यानंतर रक्तदान शिबिराला सुरवात करण्यात आली. यावेळी विठ्ठल घेवडे, किरण हिड्डदुगी, दिगंबर तेजम, शेहजाद वाटगी, श्रीहरी भोपळे, सचिन नाईक, कैफ दड्डीकर, प्रसाद हल्याळी, विजय वडर, जमीर जलाली, प्रमोद मुरकुटे, भागेश पांडव, प्रशांत मुरकुटे, रवी चव्हाण, स्वप्नील नाईक, चिन्मय शिंदे, मंथन देऊसकर, विवेक कांबळे, रोहन रेडेकर, संग्राम पाळेकर आदी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

कारागृहात मोबाईलचा वापर, मोक्कातील तिघांना अटक

Abhijeet Shinde

कणेरी येथील यश बेकरीमध्ये चोरी

Sumit Tambekar

सीनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत उचगावच्या अनिता पाटीलांना चार सुवर्ण

Abhijeet Shinde

आठवड्यानंतर रेल्वे सेवा सुरु

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पेठ वडगावात सोमवारपासून दहा दिवसाचा जनता कर्फ्यू

Abhijeet Shinde

सिंधुदूर्गातील चेन स्नॅचिंगचा कोल्हापुरात छडा

Sumit Tambekar
error: Content is protected !!