तरुण भारत

हिमाचल प्रदेशात जोरदार हिमवर्षाव

पर्वतशिखरांवर दीड ते दोन फूट हिमाचा थर 

सिमला / वृत्तसंस्था

Advertisements

हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागांमध्ये शुक्रवारपासून जोरदार हिमवर्षावाला प्रारंभ झाला आहे. लाहोल स्फिती येथे गेले दोन दिवस हिमवर्षाव होत आहे. रोहतांग दर्रा आणि कुंजोम येथे शुक्रवारी पहाटेपासून बर्फ पडण्यास प्रारंभ झाला. डोंगरमाथ्यांवर दीड ते दोन फूट बर्फाचा थर साचल्याचे सांगण्यात आले.

हिमाचल प्रदेशातील या हिमवर्षावाचा परिणाम हरियाणा आणि पंजाबमधील सखल प्रदेशांवरही होत आहे. या भागांमध्ये आता कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. हरियाणात काही स्थानी हलकी जलवृष्टी झाली. तसेच दाट धुकेही पसरले. यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. काही स्थानी वाहतूक बंद झाली.

बससेवा बंद

हिमाचल प्रदेशात डोंगराळ भागांमध्ये अनेक शहरे आणि वस्त्यांमध्ये बससेवा हिमवर्षावामुळे बंद झाली. कुल्लूकेलांग येथे बससेवा बंद झाल्याने पर्यटकांसमोर समस्या निर्माण झाली. अटल बोगद्यातून जाणाऱया बसेस काही काळासाठी बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिला गेला.

अनेक भागांमध्ये हिमवर्षाव हिमाचल प्रदेशच्या तांदी संगम, जिस्पा, कोकसर, सिस्सू, कुजोम दर्रा, रोहतांग दर्रा इत्यादी भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात हिमवर्षाव होत आहे. हिमवर्षावाचे हे प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा अधिक असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे यंदा उत्तर भारतात थंडीही अधिक पडेल, असे अनुमान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

सागर धनखड हत्या : सुशील कुमारच्या पोलीस कोठडीत आणखी 4 दिवसांची वाढ 

Rohan_P

ग्रीन झोनमध्ये दारूची दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी

Rohan_P

अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन

Amit Kulkarni

निर्भया : क्युरेटिव्ह याचिका फेटाळली, दोषींना 22 जानेवारीला फाशी

prashant_c

दुसऱया दिवशीही 5 हजारहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण

Patil_p

राम मंदिर ट्रस्ट अध्यक्षांची प्रकृती बिघडली

Patil_p
error: Content is protected !!