तरुण भारत

इचलकरंजीत सांडपाणी निचऱ्याचे तीनतेरा; पाणी निचऱ्याचे व्यवस्थापन कुचकामी

पालिकेकडून कठोर उपाययोजनांची गरज

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथे गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील सांडपाणी निचऱ्याच्या व्यवस्थापनाचे पुन्हा एकदा वाभाडे निघाले आहे. शहरातील बहुतांशी रस्त्यांना तळयाचे स्वरूप आले होते. तर काही दिवसांपूर्वी नुतनीकरण केलेली मैदाने पाण्याने भरुन गेली होती. त्यामुळे शहरातील सांडपाणी निचऱयाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.

पालिकेच्यावतीने शहरातील सांडपाणी निचऱयासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. यामध्ये प्राधान्याने सारण गटरसह अन्य छोटÎा मोठया गटरची स्वच्छता पालिका व खासगी ठेकेदाराकडून केली जाते. पण अनेक प्रभागात अशी स्वच्छताच होत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. काही महिन्यांपुर्वी शहरातील विविध भागातील अनेक सारण गटरची वर्षानुवर्षे सफाईच होत नसल्याचा प्रकार नगरसेवकांनी प्रत्यक्ष भेटी देवून उघडकीस आणला होता. पण याबाबत तक्रारी होवूनही परिस्थिती जैसे थे आहे.

याचा परिणाम वळीव अथवा अवकाळी पावसाच्या माऱयानंतर शहरवासीयांना भोगावा लागत आहे. गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसात याचा प्रत्यक्ष अनुभव शहरवासीयांनी घेतला. यावेळी शहरातील कागवाडे मळा, विकली मार्केट, राजर्षी शाहू पुतळा यासह अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साठले होते. यामुळे वाहनधारकांसह पादचारी व विक्रेत्यांना मनस्ताप भोगावा लागला. काही दिवसांपूर्वी नुतनीकरण केलेल्या आवळे मैदान येथे तर सांडपाणी निचऱयाची कोणतीही व्यवस्था केली नसल्याने या मैदानास अक्षरश: तळयाचे स्वरूप आले होते. शहरातील अन्य मैदानाची कमी-अधिक प्रमाणात हीच अवस्था दिसून येत आहे. यामुळे सारण गटर स्वच्छता ही केवळ पावसाळयापुरती मर्यादित न ठेवता संपुर्ण वर्षभर राबवणे आवश्यक आहे. तसेच शहरातील सार्वजनिक रस्ते, ओढे, गटर्स यासह अन्य ठिकाणी कायमस्वरूपी सांडपाणी व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली आहे.

Advertisements

Related Stories

राहुल गांधींचा वाढदिवस असा होणार साजरा

Abhijeet Shinde

सांगलीच्या तरणजित धिल्लोची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

Abhijeet Shinde

अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा ; चंद्रकांत पाटील यांचं थेट अमित शाहांना पत्र

Abhijeet Shinde

..शिकाऱयाच्या मृत्यूप्रकरणाचे गुढ वाढले

Amit Kulkarni

पंचगंगा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी एमपीसीबी आणि एमआयडीसी यांची समन्वय समिती

Abhijeet Shinde

बोगस डॉक्टर शोध मोहिम प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!