तरुण भारत

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे स्फोटक पुस्तक प्रसिद्ध

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपल्या आठवणींचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ येत्या 8 डिसेंबरला होणार आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या जीवनातील महत्वाच्या आठवणी, काही वर्षांपूर्वी त्यांनी अन्य तीन न्यायाधीशांसह घेतलेली वादग्रस्त पत्रकार परिषद आणि इतर अनेक स्फोटक प्रसंग त्यांनी मांडले आहेत, असे या पुस्तकाच्या प्रकाशकांनी स्पष्ट केले. ‘जस्टीस फॉर द जज’ असे या पुस्तकाचे नाव आहे. त्यांनी या पुस्तकात राफेल प्रकरण, राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयासमोर क्षमायाचना, साबरीमला निर्णय, राष्ट्रीय नागरीक सूची आणि सर्वात महत्वाचा रामजन्मभूमी निर्णय या सर्व विषयांवर त्यांची मते व्यक्त केली आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

राज्यात 299 रुग्णांची भर

Patil_p

आंदोलक शेतकरी-सरकारमध्ये आज बैठकीची 11 वी फेरी

datta jadhav

रायपुरम मतदारसंघ द्रमुकसाठी प्रतिष्ठेचा

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये 6 हजार जवान परतले

Patil_p

अर्थव्यवस्था गतिमान होण्याचा शुभसंकेत

Patil_p

देशात ओमिक्रॉनचे 174 रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!