तरुण भारत

ऍपलने आयफोन 13 चे उत्पादन घटविले

पुरवठा साखळीसह अन्य कारणांचा समावेश

नवी दिल्ली   

Advertisements

जागतिक पातळीवरील पुरवठा संकटासोबत टक्कर देणारा ऍप इंक आता आणखीन एका समस्येला तेंड देत आहे. हि समस्या मागणी कमी असल्याने आपल्या कंपोनेंटचा पुरवठा करण्याकरीता आयफोन 13 लाईनअप यांचाही मागणी प्रभावीत झाली आहे. अशी माहिती ब्लूमबर्गच्या एका अहवालामधून देण्यात आली आहे.

सदरच्या अहवालामधून ऍपल सुट्टय़ापार्टची कमतरता असल्याने मागील वर्षभरापासून ऍपलने आयफोन 13 चे उत्पादनाचे 9 कोटीचे ध्येय निश्चित केले होते. परंतु यामध्ये घट करत 1 कोटी युनिटवर आले असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये आगामी वर्षभरात पुरवठा साखळीत सुधारणा होण्याच्या अपेक्षेने ती पूर्ण करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. परंतु कंपनी आता आपल्या विक्रेत्यांना सांगत आहे, की ‘आर्डर करण्यात आलेल्या कपातीत बदल करण्यात येणार नाही. परंतु मागणीत बदल झाल्यास वेगळा विचार करण्यात येणार असल्याचेही’कंपनीने सांगितले आहे.

तज्ञांच्या मतानुसार

विश्लेषकांच्या मतानुसार वर्ष 2021 च्या अंतिम तीन महिन्यांमध्ये ऍपलची विक्री 6 टक्क्यांनी वधारुन 117.9 अब्ज डॉलरवर पोहोचण्याचे संकेत आहेत. परंतु कंपनीसाठी तिमाहीत योग्य कामगिरी होण्यावर प्रश्नचिन्ह व्यक्त केले जात आहे. याचा प्रभाव म्हणून उपकरणांच्या कमतरतेमुळे आणि डिलिव्हरीमधील दिरंगाईमुळे ग्राहक कंटाळण्याची शक्यता असून यांचा परिणाम हा येत्या काळातच काय होतो ते बघावे लागले असेही काहींनी मत नोंदवली आहेत.

Related Stories

डार्क वेब-सायबर क्राईमचे अंडरवर्ल्ड

Patil_p

वाहन-आरोग्य विम्याचे हप्ते उशिरा भरल्यास दंड नाही

Patil_p

इंडिया सिमेंटस्मधील दमानी बंधुंची हिस्सेदारी वाढली

Patil_p

मास्टर कार्ड करणार उद्योजकांना मदत

Patil_p

कोरोनाच्या धास्तीने विस्कटली आर्थिक घडी

tarunbharat

तीन विमानतळांचे खासगीकरण

Patil_p
error: Content is protected !!