तरुण भारत

टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सच्या महाराष्ट्रात 15 नव्या शाखा

वृत्तसंस्था/ मुंबई

टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स ही आघाडीची जीवन विमा कंपनी महाराष्ट्र राज्यात आपला वितरण विस्तार वाढवण्यासाठी 15 नवीन शाखा सुरु करत आहे.

Advertisements

जळगाव, रत्नागिरी, कोथरूड, नगर, सांगली, चंद्रपूर, नांदेड, नागपूर, अमरावती आणि नाशिक (झेहन सर्कल) येथे शाखा होतील. सध्या टाटाच्या देशभरातील 25 राज्ये आणि 175 शहरांमध्ये मिळून 218 पेक्षा जास्त शाखा असून एजन्सी, ब्रोकिंग, बँकाश्युरन्स, असिस्टेड परचेस आणि ऑनलाईन सेवा या क्षेत्रांमध्ये कंपनीने स्वतःचे मजबूत स्थान निर्माण केले आहे.

प्रत्यक्ष संपर्क न येता ग्राहकसेवा पुरवता याव्यात आणि कागदपत्रांविना संचालन करता यावे यासाठी प्रत्येक शाखेमध्ये डिजिटल सुविधा देण्यात आल्या आहेत.  ग्राहक बँकेच्या कर्मचाऱयांशी व्हिडिओ कॉल्समार्फत बोलू शकतात किंवा जर ते शाखेला भेट देत असतील तर स्वयंसेवा डिजिटल किऑस्कचा वापर करून आपल्या गरजा पूर्ण करून घेऊ शकतात.

Related Stories

संचारबंदीच्या कालावधीत वीज मागणी 26 टक्क्मयांनी घटली

tarunbharat

इन्फोसिसकडून ब्ल्यू अकॉर्नचे अधिग्रहण

Patil_p

सणासुदीच्या काळात हिरो इलेक्ट्रिकची विक्री दुप्पट

Patil_p

आघाडीवरच्या शंभर ब्रॅण्ड्सना मोठा फटका बसण्याची शक्यता

Patil_p

सेल्सफोर्स देणार 5 लाख जणांना रोजगार

Omkar B

खासगी इक्विटी गुंतवणूक 2.47 लाख कोटींवर

Patil_p
error: Content is protected !!