तरुण भारत

मुश्रीफ, यड्रावकर, कोरे, नरकेंनी केले आमदार जाधव कुटुंबीयांचे सांत्वन

काशीद कॉलनीतील शिवतीर्थ निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांची रिघ

कोल्हापूर / प्रतिनिधी

आमदार (कै.) चंद्रकांत जाधव (अण्णा) यांच्या कुटुंबीयांचे शुक्रवारी राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी सांत्वन केले. काशीद कॉलनी सम्राटनगर येथील शिवतीर्थ निवासस्थानी सांत्वनासाठी रिघ लागली होती. आमदार (कै.) जाधव यांचे सुपुत्र सत्यजित, बंधू माजी नगरसेवक संभाजी जाधव आणि परिवारातील इतर सदस्यांना मान्यवरांनी धीर दिला.

राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या, असिफ फरास, निवृत्त पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, निवृत्त पोलीस उपअधीक्षक सतीश माने, सुरेशदादा पाटील, माजी नगरसेवक राजेश लाटकर, विनायक फाळके, रत्नेश शिरोळकर, महेश वासुदेव, रूपाराणी निकम, सविता भालकर, अभिजित पायमल, आनंदराव पायमल, संग्रामसिंह निकम, सुनील शिपुगडे यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळांचे पदाधिकारी, औद्योगिक जगतातील मान्यवर उपस्थित होते

Advertisements

Related Stories

सांगली शहरचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहिर

Abhijeet Shinde

मोबाईल टॉवर उभारण्याच्या नियमात शिथिलता

Patil_p

वारनूळ येथील तरूणाला कोरोनाची लागण, अठरा जण क्वारंटाईन

Abhijeet Shinde

आ. ऋतुराज पाटलांकडून कोरोना लढ्यासाठी WHO चे प्रशिक्षण

Abhijeet Shinde

कर्नाटक पोटनिवडणूक: जेडी (एस) कडून उमेदवार जाहीर

Abhijeet Shinde

रामलल्लाच्या गर्भगृहाला सूर्यकिरणांनी उजळविण्याची तयारी

Patil_p
error: Content is protected !!