तरुण भारत

बाजारावर आता ओमिक्रोनचे सावट

सेन्सेक्स 764 अंकांनी प्रभावीत – पॉवरग्रिड नुकसानीत

मुंबई 

Advertisements

चालू आठवडय़ातील अंतिम सत्रात शुक्रवारी कोरोनाच्या वाढत्या संसर्गासोबत नवा विषाणून ओमिक्रोनच्या धास्तीने बाजारात नुकसानीचे सत्र राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून नव्या विषाणूची चर्चा होती. परंतु आता यांने भारतात प्रवेश केल्याने भारतीय शेअर बाजारावर कोमिक्रोनचे सावट निर्माण झाले असून यामुळे बीएसई सेन्सेक्स तब्बल 765 अंकांनी घरुन बंद झाला आहे. यासोबतच प्रमुख कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी लि., एचडीएफसी बँक आणि कोटक बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.

शेअर बाजारावर विविध घडामोडींमध्ये प्रामुख्याने गुरुवारी कर्नाटकात दोन ओमिक्रोनचे रुग्ण आढल्याने देशभरात सतर्कता राहण्यासोबत आरोग्य यंत्रणेला सुचना देण्यात आल्या आहेत. याचा परिणाम म्हणून अंतिम सत्रात शुक्रवारी सेन्सेक्स मोठी घसरण नोंदवली आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये सेन्सेक्स 764.83 अंकांनी घसरुन 57,696.46 अंकांवर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 204.95 अंकांनी घसरुन 17,196.70 वर बंद झाला आहे.

विविध कंपन्यांच्या कामगिरीमध्ये पॉवरग्रिडचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी प्रभावीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेन्ट्स, कोटक बँक, टेक महिंद्रा आणि भारती एअरटेल यांचे समभागही प्रभावीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला  लार्सन ऍण्ड टुब्रो, इंडसइंड बँक, टाटा स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग लाभात राहिले आहेत.

जगावर आता पुन्हा कोमिक्रोनची धास्ती राहणार असल्याच्या कारणास्तव शेअर बाजारात अनिश्चतात राहणर असल्याचे संकेत निर्माण होत आहे. आशियातील अन्य बाजारांपैकी चीनचा शांघाय कमोजिट, दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की हे लाभात राहिले असून युरोतील बाजार दुपारपर्यंत सकारात्मक वातावरण राहिले होते.

कच्च्या तेलाचा प्रभाव

आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 2.38 टक्क्यांनी मजबूत होत 71.32 डॉलर प्रति बॅरेलवर राहिली  आहे. मागील महिन्यात 85 डॉलर प्रति बॅरेलचा स्तर प्राप्त केला आहे. देशामध्ये पेट्रोल व डिझेल यांचे भाव मागील महिन्यात बदलले नाहीत. परंतु आगामी काळात काय स्थिती राहणार यावर बाजाराची दिशा निश्चित होणार असल्याचे संकेत आहेत.

Related Stories

कल्पतरुचा समभाग वधारला

Amit Kulkarni

फॅशन उद्योगामध्ये तेजी

Patil_p

पोलाद महागल्याने बांधकाम खर्चात वाढीचे संकेत

Patil_p

आर्थिक पॅकेज मेक इन इंडियाला चालना देणारे

Patil_p

सोनालिका ट्रक्टर्स विक्रीत वाढ

Patil_p

सफायर फूडस खाद्य केद्रांची संख्या वाढवणार

Patil_p
error: Content is protected !!