तरुण भारत

वेंगुर्लेसमोर बार्ज बुडाली? काहींना वाचविण्यात यश, अन्य बेपत्तांचा शोध सुरू

कोस्ट गार्डद्वारे हॕलिकॉप्टरने समुद्रात रात्रीचे सर्च ॲापरेशन

मालवण/प्रतिनिधी:-
मालवण समोरील समुद्रात शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास हॕलिकॉप्टरद्वारे सर्च ॲापरेशन सुरू होते. हॕलिकॉप्टरमधून मोठ्या सर्चलाईटद्वारे समुद्रात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न होत असल्याचे किनाऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते. यासंदर्भात सागरी सुरक्षा यंत्रणेतील काहींशी संपर्क केला असता जयगडहून रेडीकडे जाणारी एक बार्ज वादळी वा-यामुळे मंगळवार १ डिसेंबर रोजी बुडाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बार्जमधील चौघांना वाचविण्यात कोस्ट गार्डला यश आले आहे. मात्र अन्य चौघांचा शोध सुरू आहे. त्यासाठीच कोस्ट गार्डचे हॕलिकॉप्टर पाण्याचा प्रवाह विचारात घेऊन मालवणच्या दिशेने अन्य चौघांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान दोन दिवसांपूर्वी एक बार्ज सायंकाळी ५.३० च्या सुमारास गोव्याच्या दिशेने जात असल्याचे किनाऱ्यावरून काही मच्छीमारांनी पाहिले होते. सदर बार्ज रात्रीच्या सुमारास वेंगुर्लेसमोर वादळी वा-यामुळे दुर्घटनाग्रस्त झाल्याचे बोलले जात आहे.

Advertisements

Related Stories

राबणाऱया ‘आशां’ च्या जीवनात निराशा

Patil_p

सोलापूर : एमआयएमचे सात नगरसेवक ‘राष्ट्रवादी’मध्ये प्रवेश करण्याची चर्चा ?

Abhijeet Shinde

सातारा : लॉकडाऊनमध्ये वाढलाय ताण-तणाव

Abhijeet Shinde

कर्नाटक : राज्यात बाधितांच्या संख्येत घट

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन; पोलीस यंत्रणा सज्ज

Abhijeet Shinde

नक्षलवाद्यांकडून स्फोट, 4 जवान हुतात्मा

Patil_p
error: Content is protected !!