तरुण भारत

इराणच्या सैनिकांचा तालिबानशी संघर्ष

गोळीबारात 9 जण ठार

काबूल / वृत्तसंस्था

Advertisements

तालिबान आणि इराण सैनिकांमध्ये झालेल्या भीषण संघर्षात किमान नऊ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तालिबान प्रशासनाने केला आहे. इंधनाची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करताना अफगाणिस्तानमधील निमरोझ प्रांताजवळ ही चकमक झडल्याची माहिती तालिबानी अधिकाऱयाने दिली. तालिबानसोबतच्या संघर्षात इराणी सैनिक ठार झाल्याच्या दाव्याला इराणच्या अधिकाऱयांनी अद्याप दुजोरा दिला नाही.

गेल्या दोन दिवसांपासून या भागात संघर्ष सुरू आहे. या संघर्षादरम्यान तीन चेकपोस्ट ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिक अधिकाऱयांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिली. यासंबंधी तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद याने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. स्थानिक पातळीवर गैरसमजातून ही चकमक झाल्याची सारवासारव केली जात आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या इंधन तस्करीमुळे गैरसमज निर्माण झाला होता. या लढाईत किमान 9 इराणी सैनिक ठार झाले आहेत. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. एक तालिबानी जखमी झाल्याचे निमरोजच्या राज्यपालांनी स्पष्ट केले. तसेच परिस्थिती नियंत्रणात असून आम्ही सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

देशात 31,522 नवे कोरोना रुग्ण; 412 मृत्यू

Rohan_P

तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन निलंबित

Patil_p

लोकसभेचे 17 खासदार कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav

गरिबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज : निर्मला सीतारामन

tarunbharat

हिमाचल प्रदेशात येण्यासाठी सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Rohan_P

मेडिकॅबमध्ये होणार कोरोनावरील उपचार

Patil_p
error: Content is protected !!