तरुण भारत

देशात सक्रिय रुग्णसंख्या लाखांखाली

देशात 9,216 नवे बाधित, 8,612 जणांना डिस्चार्ज

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 99 हजार 976 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात कोविड-19 चे 9 हजार 216 नवीन रुग्ण आढळून आल्याने बाधितांची संख्या 3 कोटी 46 लाख 15 हजार 757 वर पोहोचली आहे. देशात सलग 159 व्या दिवशी दररोज 50 हजारपेक्षा कमी संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. तसेच आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 45 हजार 666 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

शुक्रवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, संसर्गामुळे आणखी 391 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 4 लाख 70 हजार 115 झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराबाबत सरकारने कोविडचे नियम कडक केले आहेत. ओमिक्रॉनच्या धोक्मयाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने विशेष सल्लागार नियुक्त केला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन सरकारने घरोघरी लसीकरण मोहीम वाढवली. मोठय़ा संख्येने लोक लसीकरण केंद्राकडे जात आहेत. नव्या व्हेरियंटचे रुग्ण सापडत असले तरी एकूण नवे बाधित नियंत्रणात असल्याने सध्या एकंदर कोरोनास्थिती आवाक्यात असल्याचे दिसून येत आहे. नव्या व्हेरियंटचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

Related Stories

देशात ओमिक्रॉनचे आतापर्यंत 78 रुग्ण

Amit Kulkarni

जेईई, नीट परीक्षांच्या तारखा जाहीर, दोन्ही परीक्षा जुलैमध्ये

Rohan_P

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या 10-12 वीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलैपर्यंत

Rohan_P

भारताच्या नकाशाची ट्विटरकडून छेडछाड कठोर कारवाईचे सरकारकडून संकेत

Patil_p

तीन दहशतवाद्यांचा पुलवामात खात्मा

Patil_p

केंद्र सरकार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषी कायदे मागे घेणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!