तरुण भारत

वाहतूक पोलिसांवर ‘आयएस’चा हल्ला

श्रीनगर / वृत्तसंस्था

काश्मीरमधील राजौरी येथे दोन दिवसांपूर्वी एका वाहतूक पोलीस कर्मचाऱयावर गोळय़ा झाडण्याची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना ‘आयएस’ने स्वीकारली आहे. जबाबदारी स्वीकारतानाच आयएस संघटनेने एक व्हिडीओही जारी केला आहे. गोळीबार करताना दहशतवादी धार्मिक घोषणा देत आहेत. हा व्हिडीओ हल्लेखोराने स्वतः शूट केला आहे. हल्ल्याच्या या पद्धतीला ‘लोन वुल्फ ऍटॅक’ असे म्हटले जाते. त्यानुसार हल्लेखोर गोळीबार केल्यानंतर गर्दीत गायब होतो.

Advertisements

20 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पोलीस जवान वाहनांनी खचाखच भरलेल्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण हाताळत असल्याचे दिसत आहे. याचदरम्यान, मागून एक दहशतवादी हातात पिस्तूल घेऊन येतो आणि वाहतूक पोलिसाच्या डोक्मयात गोळी झाडत असल्याचे दिसून येत आहे. या गोळीबारानंतर एक तरुण रस्त्यावर पडतो. त्यानंतर दहशतवादी दुसऱयावर गोळीबार करतो आणि गर्दीमधून पसार होतो.

Related Stories

सीमेवर शांतता राखण्यावर भारत-चीनमध्ये सहमती

Amit Kulkarni

काँग्रेस अन् तेजप्रतापांकडे तेजस्वींची पुन्हा डोळेझाक

Patil_p

खुशखबर! ‘सीरम’ने केली आणखी एका लसीची घोषणा

datta jadhav

‘अर्जुन’ क्षणार्धात उडवणार शत्रूच्या चिंधडय़ा

Omkar B

ममता बॅनर्जी ५० हजार मतांनी विजयी होतील; तृणमूल नेत्यांचा दावा

Abhijeet Shinde

लसनिर्मितीचे 4 प्रकार

Patil_p
error: Content is protected !!