तरुण भारत

कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनि÷ पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत शुक्रवारी कोरोनाबाधित व्यक्ती आढळली. स्पर्धेला प्रारंभ झाल्यानंतर जवळपास आठवडाभराच्या कालावधीत ही स्पर्धा सुरळीतपणे सुरू होती. पण कोरोना रुग्ण आढळल्याने या स्पर्धेवर चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.

Advertisements

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोरोना संदर्भातील सर्व नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. विविध प्रसारमाध्यमातील व्यक्तींना सुरक्षिततेच्या नियमाचे बंधन कडक करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रसारमाध्यमातील प्रत्येक व्यक्तींना 48 तासांच्या कालावधीने आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. येथील कलिंगा स्टेडियमवर गुरुवारी कोरोना चाचणीत एक व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. सदर व्यक्ती स्थानिक आयोजन समितीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहे. या घटनेमुळे या स्पर्धेच्या अनुषंगाने खळबळ माजली आहे. पत्रकारांसाठी शुक्रवारी आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली असून या चाचणीमध्ये सहभागी न झालेल्या क्यक्तीला प्रसारमाध्यम केंद्रामध्ये बंदी घालण्याचा निर्णय ओडिशा शासनाने घेतला आहे.

कोरोना महामारी समस्येची दखल घेऊन सदर स्पर्धा प्रेक्षकाविना खेळविली जात आहे. केवळ प्रसारमाध्यमातील व्यक्तींना सामन्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यजमान भारत आणि बेल्जियम यांच्यातील बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याला सुमारे 3 हजार प्रेक्षकांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली होती. कलिंगा स्टेडियमच्या सभोवार असलेल्या क्रीडासंकुलात किमान 70 ते 90 कुटुंबांचे वास्तव्य आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे या स्पर्धेवर विपरित परिणाम निश्चितच झाला आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच माघार घेतली होती. सदर स्पर्धा रविवारी संपणार आहे.

Related Stories

ओसाका विजयी, मरे पराभूत

Patil_p

रोहित-द्रविडच्या नव्या पर्वाला आज प्रारंभ

Patil_p

रशियाचा मेदव्हेदेव अंतिम फेरीत

Patil_p

प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा 27 सप्टेंबरपासून

Patil_p

व्हाईटवॉश टाळण्यासाठी भारतीय संघाचे प्रयत्न

Patil_p

तुर्की दौऱ्यावरील भारताचे ८ सदस्य बाधित

Patil_p
error: Content is protected !!