तरुण भारत

लंकेकडून विंडीजचा कसोटी मालिकेत व्हाईटवॉश

वृत्तसंस्था/ गॅले

आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत येथे झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान लंकेने विंडीजचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील दुसऱया आणि शेवटच्या सामन्यात शुक्रवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी लंकेने विंडीजचा 164 धावांनी दणदणीत पराभव केला. लंकेच्या धनंजय डिसिल्वाला सामनावीर, रमेश मेंडिसला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisements

या दुसऱया कसोटीत लंकेने पहिल्या डावात 204 धावा जमविल्यानंतर विंडीजने पहिल्या डावात 253 धावा जमवित 49 धावांची आघाडी मिळविली होती. त्यानंतर लंकेने आपला दुसरा डाव 9 बाद 345 धावांवर घोषित केला. लंकेच्या दुसऱया डावात धनंजय डिसिल्वाने नाबाद शतक झळकविताना 11 चौकारांसह 155 धावा जमविल्या. निशांकाने 4 चौकारांसह 66, एम्बुल्डेनियाने 2 चौकारांसह 39, रमेश मेंडीसने 1 चौकारासह 25, असालन्काने 19 तसेच ओशादा फर्नांडोने 14 धावा केल्या. शुक्रवारी सकाळच्या पहिल्या सत्रातच लंकेने आपला दुसरा डाव 9 बाद 345 धावांवर घोषित करून विंडीजला निर्णायक विजयासाठी 297 धावांचे आव्हान दिले. लंकेच्या दुसऱया डावात विंडीजतर्फे पेरुमलने 3 आणि चेसने 2 गडी बाद केले. होल्डर व ब्रेथवेट यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

लंकेच्या भेदक फिरकी गोलंदाजीसमोर विंडीजचा दुसरा डाव केवळ 56.1 षटकात 132 धावात आटोपला. बॉनेरने एकाकी लढत देत 3 चौकारांसह 44 तर ब्लॅकवूडने 4 चौकारांसह 36 व रॉचने 3 चौकारांसह 13, हॉपने 1 चौकारासह 16 धावा जमविल्या. विंडीजच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. रमेश मेंडीस आणि इम्बुलडेनिया यांनी प्रत्येकी 5 गडी बाद केले. या सामन्यात एम्बुल्डेनियाने 7 बळी मिळविले. त्याचप्रमाणे लंकेच्या फिरकी गोलंदाजांनी या सामन्यात एकूण 20 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

लंका प. डाव- सर्वबाद 204, विंडीज प. डाव- सर्वबाद 253, लंका दु. डाव- 9 बाद 345 (डाव घोषित) -(धनंजय डिसिल्वा नाबाद 155, एम्बुल्डेनिया 39, निशांका 66, ओशादा फर्नांडो 14, असालन्का 19, रमेश मेंडीस 25, पेरुमल 3-106, चेस 2-82, होल्डर 1-26, ब्रेथवेट 1-11), विंडीज दु. डाव- 56.1 षटकात सर्वबाद 132 (बॉनेर 44, ब्लॅकवूड 36, होप 16, रॉच 13, एम्बुल्डेनिया 5-35, रमेश मेंडीस 5-66).

Related Stories

अंशू, सोनम मलिकचे ऑलिम्पिक तिकीट निश्चित

Patil_p

बीसीसीआय वैद्यकीय पथकातील सदस्याला कोरोना

Patil_p

कॅगिसो रबाडा चौथ्या कसोटीतून निलंबित

Patil_p

विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला नऊ पदके

Patil_p

मँचेस्टर सिटीचा बर्नलीवर मोठा विजय

Patil_p

ऑस्ट्रेलियन आयपीएलवीर अखेर घरी परतले…

Amit Kulkarni
error: Content is protected !!