तरुण भारत

डेव्हिस चषक स्पर्धेत रशिया उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ माद्रिद

आंतरराष्ट्रीय टेनिसमधील प्रति÷sची आणि सर्वात जुनी समजली जाणारी डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा ही प्रत्येक टेनिसपटूच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची असते. 2021 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत रशियाने स्वीडनचा उपांत्यपूर्व सामन्यात पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. रशियाने या स्पर्धेची सलग दुसऱयांदा उपांत्य् ाफेरी गाठली आहे.

Advertisements

रशिया आणि स्वीडन यांच्यातील या लढतीत एटीपीच्या मानांकनात दुसऱया स्थानावर त्याचप्रमाणे अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम विजेता डॅनिल मेदवेदेव्हने सलामीच्या एकेरी सामन्यात स्वीडनच्या मायकेल एमेरचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात रशियाच्या पाचव्या मानांकित आंदे रुबलेव्हने स्वीडनच्या इलेस एमेरचा 6-2, 5-7, 7-6 (7-3) असा पराभव केला. आता या स्पर्धेत शनिवारी रशिया आणि जर्मनी यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. या लढतीतील विजयी संघ रविवारी सर्बियाबरोबर जेतेपदासाठी लढत देईल. 2019 साली झालेल्या या स्पर्धेत रशियाने सर्बियाचा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते.

Related Stories

पंजाब किंग्सने बांधले विजयाचे तोरण!

Patil_p

साईच्या प्रशिक्षकांची फिटनेस चांचणी होणार

Patil_p

ऑस्ट्रेलियन स्पर्धा जोकोविचला हुकण्याची शक्यता

Patil_p

टोरँटो स्पर्धेतून जोकोविचची माघार

Patil_p

साक्षी, मीराबाईला ‘अर्जुन’ यादीतून वगळले

Patil_p

कोव्हिडविरुद्ध लढय़ासाठी विराट-अनुष्काचे 2 कोटी रुपयांचे सहाय्य

Patil_p
error: Content is protected !!