तरुण भारत

पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन यांचा पराभव

मात्र उपांत्य फेरीतील स्थान निश्चित, श्रीकांत, महिला दुहेरी जोडीचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था/ बाली, इंडेनेशिया

Advertisements

बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सच्या उपांत्य फेरीतील स्थान याआधीच निश्चित झाले असले तरी भारताच्या पीव्ही सिंधूला गटातील शेवटच्या साखळी सामन्यात पराभवाचा धक्का बसला. याशिवाय किदाम्बी श्रीकांतचे आव्हानही संपुष्टात आले तर लक्ष्य सेनने याआधीच उपांत्य फेरी गाठली आहे. महिला दुहेरी अश्विनी-सिक्की रेड्डी यांना तिसरा पराभव स्वीकारावा लागला.

सिंधूला थायलंडच्या अग्रमानांकित पॉर्नपावी चोचुवाँगकडून तीन गेम्सच्या झुंजार लढतीत 12-21, 21-19, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला. सुमारे सव्वातास ही लढत रंगली होती. जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असणाऱया चोचुवाँगवर सिंधूला पुरेसे दडपण आणता आले नाही. या दोघींमध्ये आतापर्यंत सात लढती झाल्या असून सिंधूचा हा तिच्याकडून झालेला तिसरा पराभव आहे. चोचुवाँग ही 2016 मधील ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आहे. साखळी फेरीनंतर सिंधूने गट अ मध्ये दुसरे तर चोचुवाँगने पहिले स्थान मिळविले.

Nusa Dua: India’s Srikanth Kidambi competes against Malaysia’s Lee Zii Jia during their men’s singles badminton group stage match at the BWF World Tour Finals in Nusa Dua, Bali, Indonesia, Friday, Dec. 3, 2021. AP/PTI(AP12_03_2021_000002B)

पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतला गट ब मधील तिसऱया व शेवटच्या साखळी सामन्यात मलेशियाच्या द्वितीय मानांकित ली झी जियाकडून 19-21, 14-21 असा केवळ 37 मिनिटांत पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असणाऱया जियाकडून झालेला त्याचा हा दुसरा पराभव आहे. याआधी हायलो ओपनमध्येही श्रीकांत त्याच्याकडून पराभूत झाला होता. लक्ष्य सेनलाही व्हिक्टर ऍक्सेलसेनकडून गुरुवारी पराभूत व्हावे लागले असले तरी त्याचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. बुधवारी केंटा मोमोटाने दोन गेम्स झाल्यानंतर माघार घेतल्याने लक्ष्य सेनची बाद फेरी निश्चित झाली होती. मोमोटाप्रमाणे डेन्मार्कच्या रासमुस गेम्केनेही माघार घेतल्याने ऍक्सेलसेन व लक्ष्य सेन यांना उपांत्य फेरीत स्थान मिळाले.

महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांना गटातील तिसऱया व शेवटच्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. या सामन्यात मात्र त्यांनी झुंजार लढत दिली. इंग्लंडच्या क्लो बर्च व लॉरेन स्मिथ यांनी अश्विनी-सिक्की रेड्डी यांच्यावर 21-19, 9-21, 21-14 अशी मात केली.

विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन असणाऱया सिंधूला चोचुवाँगवर पुरेसे दडपण आणता आले नाही. तिच्याकडून अनेक चुका झाल्या आणि तिला रॅलीजवरही नियंत्रण ठेवता आले नाही. चोचुवाँगने दर्जेदार खेळ करीत गुण मिळविले आणि सिंधूवर 5-3 अशी आघाडी घेतली. सिंधू काही गुण मिळविण्यात यशस्वी ठरली तरी तिला आवश्यक वर्चस्व मिळविता आले नाही. चोचुवाँगने आगेकूच करीत ब्रेकवेळी 11-6 अशी बढत घेतली होती. सिंधूच्या खेळात सातत्याचा अभाव होता. त्याचा लाभ घेत तिरकस आणि चपळ फटक्यावर चोचुवाँगने लवकरच 17-9 अशी मोठी आघाडी मिळविली आणि लवकरच हा गेमही जिंकला. दुसऱया गेममध्ये चोचुवाँगच्या चुकांचा लाभ घेत सिंधूने 6-3 अशी मुसंडी मारली व नंतर बेक्रपर्यंत पाच गुणांची आघाडी घेतली. ब्रेकनंतर सिंधूकडून बचावात तीन चुका झाल्याने चोचुवाँगने तिची आघाडी 9-12 अशी कमी केली. यानंतर दोघांनी दीर्घ रॅलीज खेळल्या आणि चोचुवाँगने 16-16 वर सिंधूला गाठले. नंतर तिने 18-17 अशी किंचित आघाडीही घेतली. पण सिंधूने पुन्हा मुसंडी मारत गेमपॉईंटपर्यंत मजल मारली आणि हा गेम जिंकून सिंधूने बरोबरी साधली. निर्णायक गेममध्येही दोघींत चांगली चुरस रंगली. पण चोचुवाँगने बाजी मारत विजय मिळविला.

Related Stories

मनदीप सिंग सहावा कोरोना बाधित हॉकीपटू

Patil_p

निकोलसचा शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार!

Patil_p

पहिल्या कसोटीत इंग्लंडची घसरगुंडी

Patil_p

कोरोनाविरुद्ध मोहिमेत इस्ट बंगाल, बगानचा सहभाग

Patil_p

ऍस्टन व्हिला अंतिम फेरीत ट्रेझेग्यूचा गोल निर्णायक

Patil_p

विंडीजचा कसोटी संघ जाहीर

Amit Kulkarni
error: Content is protected !!