तरुण भारत

भारताचा स्वप्नभंग, जर्मनी अंतिम फेरीत

कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा – फ्रान्सविरुद्ध कांस्यपदकाची लढत, अर्जेन्टिनाही अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

Advertisements

विद्यमान विजेत्या भारताचे जेतेपद स्वतःकडेच राखण्याचे स्वप्न भंगले असून येथे झालेल्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेतील उपांत्य सामन्यात त्यांना जर्मनीकडून 2-4 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला. आता कांस्यपदकासाठी भारताची लढत फ्रान्सविरुद्ध रविवारी होणार आहे. दुसऱया उपांत्य सामन्यात अर्जेन्टिनाने फ्रान्सची स्वप्नवत घोडदौड रोखताना गोलशून्य बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 असा विजय मिळविला.

सहा वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱया जर्मनीची रविवारी जेतेपदाची लढत माजी विजेत्या अर्जेन्टिनाविरुद्ध होणार आहे. 2016 मध्ये लखनौत झालेल्या मागील विश्वचषक स्पर्धेत भारताने जेतेपद मिळविले होते. येथील सामन्यात मात्र भारताला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. जर्मनीचे गोल एरिक क्लीनलीन (15 वे मिनिट), ऍरोन फ्लॅटन (21 वे मिनिट), कर्णधार हॅनेस म्युलर (24), ख्रिस्तोफर कटर (25) यांनी नोंदवले. भारताचे गोल उत्तम सिंग (25 वे मिनिट) व बॉबी सिंग धामी (60) यांनी नोंदवले. आता तिसऱया-चौथ्या स्थानासाठी भारताची लढत फ्रान्सविरुद्ध होणार आहे. विशेष म्हणजे साखळी फेरीत फ्रान्सने भारताला 5-4 असा पराभवाचा धक्का दिला होता. भारताला त्या पराभवाची परतफेड करीत कांस्य मिळविण्याची संधी मिळाली आहे.

उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमविरुद्ध भारताने जिगरबाज खेळ केला होता. त्याची पुनरावृत्ती त्यांना या सामन्यात अजिबात करता आली नाही. या सामन्यात बचावफळीने उत्तम कामगिरी केली. पण सुस्तावलेल्या बॅकलाईनचा जर्मनीने पुरेपूर फायदा घेतला. मिडफील्ड आणि फॉरवर्ड लाईन यांच्यात सुसंवाद दिसून येत नव्हता तर उत्तम सिंगने अधूनमधून चांगली कामगिरी केली. जर्मनीने प्रारंभापासूनच आक्रमण करीत भारताला दडपणाखाली ठेवले होते. पाऊस सुरू असूनही भारतापेक्षा जर्मनीचा खेळ सरस झाला आणि पहिल्या 25 मिनिटात 4-1 अशी आघाडी घेतल्यानंतर जर्मनीने अखेरच्या टप्प्यात चेंडू आपल्या ताब्यात ठेवत भारताला संधी मिळणार नाही, याची दक्षता घेतली. पण अखेरच्या मिनिटाला बॉबी सिंगने भारताचा दुसरा गोल नोंदवण्यात यश मिळविले. मात्र पराभव टाळण्यास ते पुरेसे ठरले नाही.

बेल्जियम, नेदरलँड्सचे विजय

शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या वर्गवारी गटातील सामन्यात बेल्जियमने स्पेनचा 2-2 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला आणि या प्रक्रियेत बेल्जियमतर्फे डय़ुव्हेकॉट, स्टॉकब्रोक्स, बिकेन्स आणि विल्बर्स यांनी गोल नोंदविले. स्पेनतर्फे मॅन्युएल रॉड्रीग्ज आणि लेसिला यांना गोल नोंदविता आले नाहीत. अखेर बेल्जियमने स्पेनचे आव्हान 4-3 असे संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत बेल्जियमचा पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठीचा प्लेऑफ सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. अन्य एका सामन्यात नेदरलँड्सने मलेशियाचा 9-3 असा पराभव केला. नेदरलँड्सतर्फे मिलेस बुकेन्सने 3 गोल तर ल्युक डॉमेरशुझेन याने 3 गोल नोंदविले. डेव्हिड हुसेनने 2 तर मॅक्स डी. बी. याने 1 गोल नोंदविला. आता सातव्या आणि आठव्या स्थानासाठी स्पेन आणि मलेशिया यांच्यात रविवारी सामना होणार आहे. तसेच बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्यात पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी सामना होईल.

Related Stories

राष्ट्रीय सबज्युनियर मिनी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ अंतिम फेरीत

prashant_c

पीव्ही सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी केएल राहुल उपकर्णधार

Patil_p

भारताची यूएईवर एकतर्फी मात

Patil_p

सन्नाटा आणि दिलासा…

Patil_p

महिला हॉकीत नेदरलँड्सला चौथ्यांदा सुवर्ण

Patil_p
error: Content is protected !!