तरुण भारत

भाजपाने ठेकेदार पोसण्याचे काम बंद करावे

धर्मवीर युवा मंचने दिला इशारा

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. किल्ले रायगड ही अखंड हिंदूस्थानची राजधानी आहे. याच राजधानीचा पाहणी दौरा देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दि. 7 रोजी करत आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करतो परंतु राष्ट्रपतींच्या दौऱयासाठी गडावर हेलिपॅड करु नये. भाजपाने ठेकेदार पोसण्याचे नाटक करु नये, अन्यथा आम्हा शिवभक्तांना गनिमी कावा करुन हिसका दाखवावा लागेल, असा इशारा धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे यांनी दिला आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन देताना धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे, अभिजीत बर्गे, गणेश अहिवळे, अमोल खोपडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रशांत नलावडे म्हणाले, आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजधानी किल्ले रायगड आहे. याच राजधानीत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पाहणी दौऱयाला जात असतील तर त्यांचे आम्ही स्वागत करतो. परंतु त्यांच्या दौऱयासाठी गडावर हेलिपॅड करणार असतील तर ती चुकीची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकोट उभे करुन स्वराज्य उभे केले. त्याच हिंदवी स्वराज्यातील मावळय़ांना लढण्याची आणि नडण्याची शिकवण दिली. पाहणी दौऱयाकरता हेलिपॅड केल्यानंतर तेथे धुळ उडणार आहे. गडाचे पावित्र्य जोपासले जाणार नाही. मात्र, भाजपाने ठेकेदार पोसण्याचा धंदा करु नये. कोणाच्या हितासाठी कोणच्या फायद्यासाठी हा दौरा होत असेल तर आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही. गनिमी काव्याने आंदोलन करुन हिसका दाखवावा लागेल असा इशारा दिला आहे.

Related Stories

बोरगाव पोलिसांनी उघडकीस आणली हायवे रॉबरी

Abhijeet Shinde

अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यावर वाई वनविभागाची कारवाई

datta jadhav

मराठा आरक्षणासाठी चोराडे ग्रामस्थांची पालकमंत्र्यांच्याकडे धाव

Omkar B

कोल्हापूर : वारणा समूहातील जेष्ठ कार्यकर्ते विष्णू बच्चे यांचे निधन

Abhijeet Shinde

बार्शीतील युवकाने बनवला चक्क सोन्याचा मास्क

Abhijeet Shinde

नितेश राणेंच्या टीकेला भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर ; म्हणाले, ”मी फडतूस माणसाबद्दल बोलत नाही”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!