तरुण भारत

साताऱयात युवकावर तलवारीने वार

संशयितावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

काँग्रेस भवनच्या शेजारील पान टपरीवर सिगारेट ओढत उभा असणाऱया संदीप आनंद मेळाट (वय 31 रा. शाहूपुरी) याच्यावर तलवारीने हल्ला करत डोक्यात, कानावर वार केले. या प्रकरणी संशयित मनोज घाडगे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी संदिप आनंद मेळाट (वय 31 रा. शाहूपुरी) हा गुरूवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कॉँग्रेस भवनच्या शेजारी असणाऱया पानटपरी जवळ गेला. त्याने चार सिगारेट खरेदी केल्या. आणि तो टपरी शेजारी सिगारेट ओढत उभा होता. या टपरी शेजारी संशयित मनोज घाडगे हा तलवार घेऊन उभा होता. तो ओमणी गाडीत बसलेल्या काही युवकांशी वाद घालत होता. हे युवक गेल्यानंतर मनोज हा संदिप यांच्याजवळ आला व त्याने तलवारीने संदिपच्या डोक्यात व कानावर वार केले. तू येथून निघून जा नाहीतर तलवार मी तुझ्या पोटात खूपशीन असा म्हणाल्याने संदिप जखमी अवस्थेत  तत्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असून मनोज घाडगे विरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.

Related Stories

राधानगरी तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

Abhijeet Shinde

किंगबेरी या नव्या द्राक्ष वाणाचे शनिवारी लोकार्पण

Abhijeet Shinde

Porn apps Case : राज कुंद्रानंतर आणखी एकाला अटक

Abhijeet Shinde

शिकारीच वन विभागाच्या जाळ्यात, 12 जणांना अटक

Abhijeet Shinde

सातारा : थेट विक्रीमुळे कष्टकरी शेतकरी उद्योजक होईल : हणमंतराव शिंदे

Abhijeet Shinde

शेंद्रनजिक ट्रक अपघातात दोन ठार

Patil_p
error: Content is protected !!