तरुण भारत

दगडखाणीतील तो खून नरबळीतून झाल्याचा संशय

प्रतिनिधी/ सातारा

सातारा तालुक्यातील खिंडवाडी येथे दि. 17 नोव्हेंबरला बीड येथील अमोल डोंगरे या युवकाचा खून झाल्याची घटना सातारा शहर पोलिसांनी उघडकीस आणली. त्या तरुणाचा खून हा नरबळीतून झाल्याचे अनेक पुरावे समोर येत असून पोलिसांनी त्यादृष्टीने कसून तपास करावा आणि पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे केली आहे. त्यामुळे सातारा शहर पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

Advertisements

   सातारा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देताना डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, हौसेराव धुमाळ, वंदना माने, शंकर कणसे आदी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमोल डोंगरे यांचे बंधू भागवत डोंगरे (रा. कोठरबन, ता. वडवणी, जि. बीड) यांनी अंनिसला संपर्क करून दिलेल्या तक्रार अर्जानुसार अंनिस कार्यकर्त्यांनी याविषयी सखोल चौकशी केली असता असे समोर आले आहे की, मधुकर सोनावणे हा खून प्रकरणात सापडलेला संशयित आरोपी स्वतः मांत्रिक म्हणून कोठरबन येथे कार्यरत होता. त्याच्याकडे दैवी शक्ती असून तो तंत्रमंत्र विद्या जाणतो. असे तो म्हणत  आणि लोकांना भूत उतरवणे, खजिना शोधणे अशा गोष्टींच्या साठी मदत करण्याचे दावे करून फसवत असे. मुळचे कोठरबनचे रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जावळे आणि केशव वाघमारे यांनी दिलेल्या माहिती नुसार संशयित आरोपी मधुकर सोनावणे हा त्या गावात गेले. काही महिने समुद्रातील सोने काढून देतो असे सांगून लोकांची फसवणूक करीत होता आणि त्यायोगे एखाद्या व्यक्तीला मोहात पडून त्याला बळी देण्याचे त्याचे मनसुबे होते असा संशय गावात व्यक्त केला जात आहे. अशी कोणती व्यक्ती सहज न भेटल्यामुळे अमोल डोंगरे याचे ट्रान्सपोर्ट व्यवसायातील सहकारी सुनील रखमाजी डोंगरे यांना सोबत घेऊन सोनावणे याने अमोल डोंगरे याच्या खुनाचे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

  पोलिसांना दिलेल्या जबाबात देखील त्याने याची वाच्यता केली आहे. तसेच अमोल डोंगरे याचा खून केल्याने आपण आता अमर झालो. अमोल डोंगरे माझ्या राशीला आला होता म्हणून त्याला ठार मारले अशी विधाने संशयित आरोपीकडून केली गेली आहेत. तसेच खुनाच्या नंतर अमोल डोंगरेच्या मृतदेहाच्या पायाला बिबा बांधून त्याला लिंबखिंडी जवळच्या खाणीत टाकण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर अमोल डोंगरे खून प्रकरणात नरबळीच्या शक्यतेचा विचार करून पोलीस दलाने कसून चौकशी करावी आणि संशयित आरोपांना जादूटोणा विरोधी कायद्याची कलमे देखील लावावीत, अशी मागणी अंनिस मार्फत करण्यात आली आहे.

Related Stories

इंडस्ट्रीयल ऑक्सिजन दुय्यम करून हॉस्पिटला प्राधान्य द्या : खा. संजय पाटील

Abhijeet Shinde

डॉ.आशितोष भोसले यांना वैदयकिय क्षेत्रातला “डॉ.स्टीव्ह रोचा पुरस्काराने सन्मानित

Patil_p

आतुरता संपली, आज ‘व्हेंलेटाईन डे’

Patil_p

… खरंच कोरोना आहे का ?

Patil_p

सातारा : ओझर्डे येथून मनोरुग्ण बेपत्ता

datta jadhav

सातारा : जिल्हा रूग्णालयातील परिचारिकांचे हाेत आहेत हाल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!