तरुण भारत

‘जैतापूर’साठी 3 आंतरराष्ट्रीय कंपन्यांची हातमिळवणी

6 अणुभट्टय़ा तयार करण्याच्या प्रकल्पाला प्रतिसाद

प्रतिनिधी/  रत्नागिरी

Advertisements

अपावे, ईएसआय गुप आणि ऑननेट टेक्नोलॉजी या तीन कंपन्यांनी जागतिक अणु प्रदर्शन 2021 मध्ये परस्पर सहयोगातून मेक इन इंडिया न्यूक्लियर सप्लाय चेन सपोर्टद्वारे जैतापूर अणुउर्जा प्रकल्पासाठी 6 ईपीआर अणुभट्टय़ा तयार करण्याच्या प्रकल्पाला प्रतिसाद दिला आह़े त्यासाठी परस्पर सहकार्याचा एक प्रस्ताव तयार करण्याची औपचारिकता नुकतीच या कंपन्यांनी पार पाडल्याचे सांगण्यात येत आहे          

  अपावे ग्रुपचे सीईओ फिलिप मेलर्ड इमॅन्युएल लेरॉय, ईएसआय ग्रुपचे ईव्हीपी उत्पादन, इनोव्हेशन आणि इंडस्ट्री सोल्युशन्स आणि टेक्नॉलॉजीचे सीईओ ऍलेन गॉविन यांनी व ऑननेट टेक्नोलॉजी कार्यकारी अध्यक्ष झेवियर यांनी जागतिक अणु प्रदर्शनात या करारावर स्वाक्षरी केली. अणुप्रकल्पासाठी अभियांत्रिकी पातळीवर एकत्रितरित्या सहकार्याची संयुक्त घोषणा करण्यात आली आह़े

                   एक अद्वितीय भारतीय प्रकल्प

एप्रिल 2021 मध्ये प्रेंच बहुराष्ट्रीय इलेक्ट्रिक्युटिलिटी कंपनी ईडीएफने न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे जैतापूर साईटवर भारतात 6 प्रेशराईज्ड वॉटर रिऍक्टर अणुभट्टय़ा बांधण्यासाठी तांत्रिक व व्यावसायिक कौशल्य देण्याची तयारी दर्शवली होत़ी अणु क्षेत्रातील 40 वर्षांहून अधिक अनुभवाच्या आधारे अपावे ईएसआय गुप आणि ऑननेट टेक्नोलॉजी यांनी त्यांची कौशल्ये व ज्ञान या उर्जा प्रकल्पासाठी उपयोगात आणण्यात येणार आह़े अणुढर्जा तंत्रज्ञानासाठी आण्विक अभियांत्रिकीत नियामक व गैर-नियामक सुरक्षा व सुरक्षा आवश्यकतांचे पालन करून ऑननेट टेक्नोलॉजी या प्रकल्पासाठी सेवा देणार आह़े 

ईडीएफने न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अभियांत्रिकी व नवीन अणु प्रकल्प विभागाचे कार्यकारी संचालक झेवियर म्हणाले की, अपावे ईएसआय गुप व ऑननेट टेक्नोलॉजीसारख्या अनुभवी भागीदारांनी भारतातील या प्रकल्पाच्या अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी सामील झाले आहेत. या कंपन्याची समान धोरणे व अणुढजा प्रकल्पांची माहिती या मोठय़ा प्रकल्पाच्या यशात एक मैलाचा दगड ठरणार आह़े या अणुउढर्जा पॉवर प्लांटच्या बांधकामाचा कालावधी 15 वर्षांपेक्षा जास्त असणार आह़े अपावे गुप हा जोखीम व्यवस्थापनाचा 150 वर्षांहून अधिक अनुभव असलेला आंतरराष्ट्रीय गट आहे. 2019मध्ये 881 एमची उलाढाल असलेली ही स्वतंत्र कंपनी आह़े राज्यात 12,600 कर्मचारी, फ्रान्समध्ये 130 एजन्सी, फ्रान्स व परदेशात 170 प्रशिक्षण स्थळे व 18 चाचणी केंद्रे आहेत. अपावेची 45 पेक्षा जास्त केंद्रे देशांमध्ये कार्यरत आहेत.

Related Stories

रक्तपेढीला पलंग बेडची देणगी

NIKHIL_N

वार्षिक आराखडय़ाला 80 कोटीची कात्री

NIKHIL_N

बांद्यात फोटो स्टुडिओत घुसून माकडांचा धुडगूस

NIKHIL_N

कोरोना समिती सदस्यांना विश्वासात न घेता सचिवांची मनमानी- ग्रामपंचायत सदस्य विष्णू कोंडसकर यांचा आरोप

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : जैतापूर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

Abhijeet Shinde

मासे मिळत नसल्याने मच्छीमारी बोटी चार दिवस किनाऱयाला!

Patil_p
error: Content is protected !!