तरुण भारत

अस्मिता नाईकची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आदर्श विद्यामंदिर पदवीपूर्व महाविद्यालयाच्या अस्मिता नाईकने रौप्यपदक पटकावले. यामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Advertisements

सदर स्पर्धेत 46 किलो वजनी गटात अस्मिता नाईकने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र तिला पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. बेंगळूर येथे होणाऱया कुस्ती स्पर्धेसाठी तिची बेळगाव संघात निवड झाली आहे. त्याचप्रमाणे जोतिबा नाईक याने या स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले. त्यांना संस्थेचे चेअरमन माजी खासदार अमरसिंग पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य के. पी. शिवराई व प्राध्यापक वर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे.

Related Stories

केंद्र सरकारविरोधात थोपटले दंड

Amit Kulkarni

किरकोळ भाजीपाला बाजारात दर चढेच

Patil_p

एपीएमसीत स्थानिक गुळाची आवक सुरू

Patil_p

राष्ट्रीय विज्ञान अकादमी स्पर्धेत बेळगावच्या युवकांची बाजी

Amit Kulkarni

महात्मा फुले मार्केटचे प्रवेशद्वार केले सील

Patil_p

कोरोनावरील लसीचा प्रयोग निश्चितच यशस्वी होईल!

Patil_p
error: Content is protected !!