तरुण भारत

मास्टर्स राष्ट्रीय स्पर्धेत बेळगावच्या तीन जलतरणपटूंचे यश

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

मंगळूर येथील सेंट अल्वाज महाविद्यालयाच्या जलतरण तलावात झालेल्या 17 व्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत इंद्रजीत हलगेकर, लक्ष्मण कुंभार, ज्योती कोरी यांनी यश संपादन केले.

Advertisements

दर 5 वर्षांनी घेण्यात येते. वयस्करांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन भारतीय जलतरण संघटनेतर्फे करण्यात येते. त्यामुळे वयस्कर जलतरणपटूकडूनही त्याला प्रत्येक वेळी उत्तम प्रतिसाद मिळत असतो.

26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान मंगळूर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत बेळगावच्या इंद्रजीत हलगेकरने 100 मीटर बॅकस्ट्रोक व 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये 1 सुवर्ण व 1 कांस्य पदक पटकाविले. लक्ष्मण कुंभार याने 50 मीटर बटरफ्लाय, 200 मीटर फ्रिस्टाईल, 100 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये 1 रौप्य व 2 कांस्यपदके पटकावली. महिलांच्या गटात ज्योती कोरीने 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक मिळविले. हे तिन्ही स्पर्धक केएलई सुवर्ण जलतरण तलावात सराव करीत असून, त्यांना उमेश कलघटगी, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडुलकर, आनंदेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन तर डॉ. प्रभाकर कोरे, केएलईचे उपकुलगुरू डॉ. विवेक सावजी, अविनाश पोतदार, माकी कपाडिया व लता कित्तूर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Related Stories

फेसबुक प्रेंड्स सर्कलतर्फे अबनाळी येथे मास्कचे वितरण

Amit Kulkarni

महामार्गावर बंदोबस्त,वाहनांची तपासणी

Omkar B

गोकुळ पाटील सुवर्णपदकाने सन्मानित

Omkar B

असा आहे आपला वॉर्ड

Patil_p

भात-मक्याला हमीभावप्रमाणे खरेदी केंद्रे सुरू करा

Patil_p

वीज-पाणी पुरवठय़ाविना गाळे भाडेतत्त्वावर

Amit Kulkarni
error: Content is protected !!