तरुण भारत

वकील दिनानिमित्त ज्येष्ट वकिलांचा सत्कार

प्रतिनिधी /बेळगाव

वकील दिनानिमित्त बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने ज्येष्ट  वकिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यतनट्टी होते. यावेळी वकील दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जन्मदिनानिमित्त वकील दिन साजरा केला जातो.

Advertisements

ज्येष्ट वकील आणि माजी खासदार ए. के. कोटरशेट्टी, ज्येष्ट वकील टी. एन. सानीकोप्प, ज्येष्ट महिला वकील आणि नोटरी व्ही. एस. मंडरोळी यांचा बार असोसिएशनच्या जुन्या सभागृहात सत्कार करण्यात आला. तर ज्येष्ट वकील किसनराव येळ्ळूरकर आणि वकील राम आपटे यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यतनट्टी, जनरल सेपेटरी गिरीश पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष सचिन शिवण्णावर, उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, जॉईंट सेपेटरी बंटी कपाई यांच्यासह माजी उपाध्यक्ष गजानन पाटील, ऍड. ईश्वर घाडी, ऍड. अमर येळ्ळूरकर, ऍड. सतीश बांदिवडेकर, सर्व सदस्य व वकील उपस्थित होते.

Related Stories

गणेशोत्सवासाठी पाच दिवसांचा नियम शिथिल

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात शुक्रवारी 156 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Patil_p

तिनचाकी वाहनासाठी दिव्यांगांकडून अर्ज स्विकार- पडताळणी

Patil_p

अलायन्स इंटरनॅशनल क्लबतर्फे पोलिसांना मास्क वितरण

Patil_p

जिल्हा पोलिस प्रमुखांनाही कोरोनाची लागण

Rohan_P

मनपावर लाल-पिवळा ध्वज लावणे म्हणजे राष्ट्रदोहच!

Amit Kulkarni
error: Content is protected !!