तरुण भारत

दुर्लक्षाचा कहर, नेत्यांनो करा खड्डेमय रस्त्यांची सफर!

शहरातील रस्त्यांची अवस्था मंत्री-महोदयांच्या निदर्शनास येण्याची गरज : अधिवेशनासाठी रस्ते गुळगुळीत करण्याचा प्रशासनाचा आटापिटा

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंत्री-महोदयांच्या वाहनांसाठी रस्ते गुळगुळीत करण्याचा आटापिटा प्रशासनाने चालविला आहे. पण एक हजार कोटी खर्चून स्मार्ट सिटी बनविण्यात येत असलेल्या शहरातील रस्त्यांची अवस्था मंत्री-महोदयांना समजण्यासाठी या रस्त्यांची डागडुजी करण्यात येऊ नये, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

शहर स्मार्ट बनविण्यासाठी एक हजार कोटीचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. मात्र शहरातील अंतर्गत रस्ते तसेच उपनगरांतील काही रस्त्यांची दैना झाली आहे. तिसऱया रेल्वेगेट परिसरात खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणाऱया रस्त्यावरून ये-जा करणे वाहनधारकांना अवघड बनले आहे. सध्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत असून या रस्त्यावरही माती घालून रस्ता व्यवस्थित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येवू नये, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. व्हीटीयू येथे मुख्यमंत्र्यांसह वरि÷ अधिकारी वास्तव्यास असतात. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याचा आटापिटा सुरू आहे. स्मार्ट सिटी बनविण्यासाठी एक हजार कोटी खर्चून शहरातील रस्त्यांची अवस्था काय आहे, हे मंत्रीमहोदय आणि वरि÷ अधिकाऱयांना माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळेच रस्त्याची डागडुजी करण्यात येऊ नये. या रस्त्यावरूनच मंत्रीमहोदयांची वाहने फिरू दे, अशी मागणी होत आहे.

मंत्री-महोदयांच्या वाहनांसाठी रस्त्याची दुरुस्ती

शहर आणि उपनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. येथील खड्डे भरण्याकडे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. मात्र हेच खड्डे आता जीवघेणे बनले असल्याने वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत. अशा धोकादायक खड्डय़ांची दखल घेण्याकडे आजपर्यंत प्रशासनाने कानाडोळा केला आहे. पण आता मंत्रीमहोदयांच्या वाहनांसाठी रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे.

शहर आणि उपनगरांतील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध निधीअंतर्गत कोटय़वधीचा निधी खर्ची घातला जातो. पण प्रत्यक्षात खर्ची घालण्यात आलेल्या निधीप्रमाणे रस्त्यांची देखभाल केली जात नाही. यामुळे रस्त्यांची दुरवस्था होत असल्याने वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तिसऱया रेल्वेगेट परिसरात खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी पाणी साचले असल्याने वाहनधारकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे. पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच काहीवेळा दुचाकी वाहनधारक पडत असल्याने धोकादायक बनले आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने खड्डे बुजविण्याची गरज आहे. पण याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही याची दखल घेण्यात आली नसल्याने मोठा अनर्थ घडण्याची प्रतीक्षा महापालिकेचे अधिकारी करीत आहेत का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

वाहनधारकांचे जीव धोक्यात…

बहुतांश ठिकाणी खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे. याचा धोका वाहनधारकांना निर्माण झाला आहे. तिसऱया रेल्वेगेट रस्त्यावरील खड्डय़ांची समस्या नेहमीचीच बनली असून यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. रस्त्यावर अपघात घडून नागरिकांचे बळी जात असल्याने याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक करीत आहेत. बहुतांशवेळा खड्डे चुकविण्यास जाऊन दुचाकी वाहनांचे अपघात घडत असल्याच्या तक्रारी होत आहेत. यामुळे वाहनधारकांचे जीव धोक्यात आले आहेत.

Related Stories

राज्यात दररोज 10 हजार घरांना नळजोडणी

Amit Kulkarni

प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीची सभा खेळीमेळीत

Amit Kulkarni

एकसंबा ‘प्रकाश’मय, बोरगाव ‘उत्तम’च

Omkar B

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत राव अकादमीचे घवघवीत यश

Amit Kulkarni

विकेंड कर्फ्यूत अनावश्यक फिरणे टाळा

Amit Kulkarni

संगोळ्ळी रायण्णा स्मारकासाठी निधी मंजूर करण्याची ग्वाही

Amit Kulkarni
error: Content is protected !!