तरुण भारत

मसणाई देवीची यात्रा भरविण्यासाठी आतातरी मुभा द्या

कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत सदस्यांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कंग्राळी खुर्द येथील मसणाई देवीची यात्रा 21 व 22 डिसेंबर रोजी आहे. ती यात्रा साजरी करण्यास भक्तांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ही यात्रा भरविण्यात आली नाही. मात्र आता कोरोना आटोक्मयात आला आहे. तेंव्हा आम्हाला यात्रा साजरी करण्यास परवानगी द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

बेळगाव शहरापासून जवळच कंग्राळी गाव आहे. मसणाई देवीचे भक्त मोठय़ा प्रमाणात आहेत. गाव पातळीवर ही यात्रा भरविली जाते. नातेवाईक, मित्रमंडळी या यात्रेसाठी येतात. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ही यात्रा भरविली गेली नाही. तेंव्हा किमान यावषी तरी यात्रा भरविण्यासाठी आम्हाला मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यात्रेपूर्वी कंग्राळी खुर्द येथील चौकाचा रस्ता देखील पूर्ण करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष ज्योती पाटील, ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे, कल्लाप्पा पाटील, रेखा पावशे, सुनीता जाधव, भाग्यश्री गौंडाडकर, वीणा मुतगेकर, लता पाटील, दोड्डप्पा माळगी आदी उपस्थित होते.

Related Stories

बागलकोट जिल्हय़ात आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

ग्राम पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुका लवकरच

Patil_p

कुद्रेमनी ग्रामस्थांची अडवणूक करु नका

Rohan_P

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या

Patil_p

मराठा संस्कृती संवर्धन संघटनेतर्फे रक्तदान शिबिर

Patil_p

नव्या विद्युत मीटरची शहरात कमतरता

Amit Kulkarni
error: Content is protected !!