तरुण भारत

यरमाळ-वडगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे

कांही ठिकाणी लाल माती टाकल्याने सर्वत्र दलदल : दुरुस्तीची मागणी

वार्ताहर /धामणे

Advertisements

वडगाव ते यरमाळ हा पाच किलो मीटरचा रस्ता शासनदरबारी नेंद आहे की नाही? असा प्रश्न या रस्त्याने ये-जा करणाऱया वाहनधारकांतून उपस्थित होत आहे.

वडगाव ते यरमाळ हा रस्ता अनेक गावच्या नागरिकांना सोयीचा आहे. परंतु गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पाच किलो मीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून काही ठिकाणी रस्ता खचल्याने वाहनधारकांना ये-जा करणे कठीण बनले आहे. आता या रस्त्यावरील काही ठिकाणच्या खड्डय़ात लाल माती टाकल्याने सध्या सुरू असलेल्या पावसामुळे चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.

हा रस्ता वडगावपासून अवचारहट्टी गावातून जाऊन यरमाळ गावाला जोडला गेला आहे. यरमाळ येथून राजहंसगड येथून जाणाऱया देसूर ते नंदिहळ्ळी रस्त्याला हा रस्ता जोडला गेला असून त्याचप्रमाणे यरमाळ येथून नागेनहाळ हा संपर्क रस्ता असून के. के. कोप्प येथून बागेवाडीला जोडला गेला आहे. त्यामुळे त्या भागातील सर्व गावातील वाहनधारकांना वडगाव ते यरमाळ रस्ता अत्यंत सोयीचा आहे. परंतु खराब झाल्यामुळे या भागातून शहराकडे येणाऱया वाहनधारकांना गैरसोयीचे झाले आहे. त्यामुळे वडगाव ते यरमाळ हा रस्ता शासनदप्तरी नोंद आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील लोकप्रतिनिधींनी हा रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहनधारकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

…अन्यथा सेवा स्थगित करू

Amit Kulkarni

गरज वाहनांच्या प्रखर दिव्यांवर रोख घालण्याची

Patil_p

न्यू गुड्सशेड रोड येथील खड्डय़ांनी नागरिक त्रस्त

Amit Kulkarni

पुरस्कारांच्या रकमेतून गरिबांना मदत

Amit Kulkarni

लोकमान्य सामाजिक-सांस्कृतिक केंद्रातर्फे उद्या ‘मराठा शौर्य दिन’

Amit Kulkarni

शहर परिसरातील खुल्या जागा-मैदाने बनली गैरधंद्यांचे माहेर घर

Amit Kulkarni
error: Content is protected !!