तरुण भारत

बिजगर्णी गावात भरविणार कुस्ती आखाडा

कुस्तीगीर संघटनेच्या नूतन पदाधिकाऱयांची निवड : ग्रामस्थ-पंचमंडळीच्या बैठकीत निर्णय

वार्ताहर /किणये

Advertisements

बिजगर्णी येथील ब्रम्हलिंग कुस्तीगीर संघटनेच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त भव्य कुस्ती आखाडा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. नूतन कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली. गुरुवार दि. 2 रोजी ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी वसंत अष्टेकर होते.

दि. 1 मार्च 2022 रोजी कुस्ती आखाडा भरविण्याचे ठरविण्यात आले. यावेळी के. आर. भाष्कळ यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविक वाय. पी. नाईक यांनी करून कुस्ती नियोजनाबद्दल आढावा घेतला. गेल्यावषी गावाच्या सहकार्याने कुस्ती आखाडा यशस्वी केला होता. पुढील बैठकीत विविध समित्या स्थापन केल्या जातील, असे सांगितले. सुनील जाधव यांनी कुस्तीला मोठी परंपरा आहे, अशा आखाडय़ातून राष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडले जातील. ग्रामीण भागात युवकांनी पुढे येऊन, व्यसनाधीन न बनता जिद्द, चिकाटी ठेवून गावचे नाव उज्ज्वल करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत, असे सांगितले. मनोहर बेळगावकर यांनी सांगितले की, युवकांना प्रोत्साहन देणं, कुस्ती खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून हा आखाडा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांच्या सहकार्याने कुस्ती आखाडा यशस्वी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रा. आनंद आपटेकर, पोमाण्णा कुन्नूरकर, परशराम भाष्कळ, मनोहर प. मोरे, सुरेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीत नूतन कार्यकारिणी गावच्या सहकार्याने एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष वसंत अष्टेकर, सचिव वाय. पी. नाईक, खजिनदार पी. एस. भाष्कळ, कार्याध्यक्ष मनोहर बेळगावकर, उपाध्यक्ष प्रा. आनंद आपटेकर, सहसचिव मनोहर मोरे, उपखजिनदार रजनीकांत अष्टेकर, मार्गदर्शक के. आर. भाष्कळ, सल्लागार म्हणून पै. परशराम ना. भाष्कळ, सुरेश कांबळे, पोमाण्णा कुन्नूरकर, सुनील जाधव तसेच सदस्य म्हणून इतर दहा जणांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी भावकू मोरे, कृष्णा जाधव, शंकर पाटील, शिवानंद हलकर्णीकर, बळीराम भास्कळ, बापू सुतार, परशराम बर्डे, गावडू मोरे, महादेव अष्टेकर, मल्लाप्पा कांबळे आदी कुस्तीप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन के. आर. भाष्कळ तर सुरेश कांबळे यांनी आभार मानले.

Related Stories

सकाळची बेंगळूर फेरी होणार पूर्ववत

Patil_p

तिसऱया रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम वेळेत होणे अशक्मय

Patil_p

डीयूएफसी, युनायटेड ब्रदर्स विजयी

Amit Kulkarni

आजपासून होणार शहराच्या बाहेर भाजीविक्री

Patil_p

दुसऱया रेल्वे फाटकावर वाहनांच्या रांगा

Amit Kulkarni

सीसीटीव्ही फुटेजवरुन घरफोडय़ांचा तपास

Patil_p
error: Content is protected !!