तरुण भारत

हिंडलगा ग्रा. पं. समोर रोहयो कर्मचाऱयांचे धरणे आंदोलन

रोजगार मिळत नसल्याने मण्णूर-आंबेवाडी येथील महिला कर्मचारी संतप्त : पीडीओंच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

वार्ताहर /हिंडलगा

Advertisements

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम देण्याच्या मागणीसाठी शुक्रवार दि. 3 रोजी मण्णूर व आंबेवाडी गावातील महिला कर्मचाऱयांनी हिंडलगा ग्राम पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून पंचायतीच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध केला. त्यामुळे येत्या सोमवारपासून गावातील रोहयो कर्मचाऱयांना ठिकठिकाणी काम देण्याचे आश्वासन ग्रा. पं. च्या अधिकाऱयांनी दिले आहे.

याबाबत महिला कर्मचाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून सर्व रोजगार हमी योजनेतील कर्मचारी कामाविना रिक्त झाले आहेत. बहुतांश कर्मचाऱयांची शेतीदेखील नाही. त्यामुळे काम नसल्याने आर्थिक ओढाताण होत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील महिला व नागरिकांना रोजगार हमी योजना उदरनिर्वाहासाठी वरदान ठरली आहे. पण पावसाळा संपून देखील अनेकदा मागणी करूनही ग्राम पंचायतीच्या अधिकाऱयांनी काम देण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले होते. त्यामुळे संतापलेल्या महिला कर्मचाऱयांनी शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेत ग्राम पंचायत कार्यालयासमोर थेट धरणे आंदोलन केले. व पंचायतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कार्यालयासमोर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

परिणामी काही वेळानंतर ग्राम पंचायत अधिकाऱयांनी नरमाईची भूमिका घेत महिला कर्मचाऱयांशी सविस्तर चर्चा केली. पीडीओ इंदिरा गाणगेर यांनी पंचायतीची समस्या सांगून येत्या सोमवारपासून काम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, सुधीर काकतकर यांच्यासह रोहयो कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

जितो लेडिज विंगतर्फे किचन गार्डनवर मार्गदर्शन

Amit Kulkarni

लॉकडाऊनमध्ये दिव्यांगांची परवड

Amit Kulkarni

शंकरगौडा पाटील यांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गेंची भेट

Patil_p

भाषिक अल्पसंख्याक फेडरेशनचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

Amit Kulkarni

तरूण भारतचा ‘बेळगाव पॅटर्न’ ठरला हिट

Patil_p

‘तीळगूळ’ खरेदीसाठी बालचमूंचा उत्साह

Patil_p
error: Content is protected !!