तरुण भारत

न्यू सैनिक सोसायटीच्या चेअरमन-सेक्रेटरीवर फौजदारी गुन्हा

ग्राहक न्यायालयाने दिला निकाल, बचत खात्यावरील रक्कम परत दिली नसल्याने होणार कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

येळ्ळूरमधील न्यू सैनिक सोसायटीच्या ग्राहकाला बचत खात्यावरील रक्कम परत दिली नाही. त्यामुळे ग्राहक न्यायालयाने न्यू सैनिक सोसायटीचे चेअरमन जी. आय. पाटील आणि सेक्रेटरी मेघराज कुगजी, संचालक सिद्धेश्वर दणकारे, संचालक प्रकाश बी. पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा आदेश ग्राहक न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

न्यू सैनिक सोसायटीचे ग्राहक श्रीधर मारुती पाटील यांनी या सोसायटीमध्ये आरडी भरली होती. ती रक्कम बचत खात्यावर वर्ग करण्यात आली. एकूण 35 हजार 108 रुपये ती रक्कम होती. 5 जानेवारी 2021 रोजी ती रक्कम वर्ग करण्यात आल्यानंतर ती रक्कम काढण्यासाठी श्रीधर पाटील यांनी सोसायटीमध्ये गेले. मात्र ती देण्यास टाळाटाळ केली होती.

न्यायालयाच्या आदेशानंतरही रक्कम देण्यास टाळाटाळ

त्यानंतर श्रीधर पाटील यांनी ग्राहक न्यायालयात त्यांच्या विरोधात खटला दाखल केला. 15 सप्टेंबर 2021 रोजी न्यायालयाने श्रीधर पाटील यांना दोन महिन्यांच्या आत 35 हजार 108 रुपये सहा टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले होते. याचबरोबर 3 हजारांचा दंडही ठोठावला होता. मात्र त्यानंतरही ही रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहक न्यायालयाने या दोघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर चेअरमनसह सेपेटरी व संचालकांना नोटीस बजावली आहे. यामुळे ग्राहकाला दिलासा मिळाला आहे. या खटल्यात फिर्यादीच्यावतीने ऍड. एन. आर. लातूर यांनी काम पाहिले.

Related Stories

कोल्हापूर : कर्नाटक पासिंग वाहनांना शिवसेनेने लावले ‘जय महाराष्ट्र’ चे फलक

Abhijeet Shinde

आता धावणार मोबाईल फिव्हर क्लिनिक बस

Patil_p

तानाजी गल्ली-बसवण कुडचीतील नागरिकांनी केल्या गटारी साफ

Amit Kulkarni

जिह्यात शुक्रवारी 24 कोरोना बाधित

Patil_p

सुवर्णसिंहासनासाठी कर्तव्यनिधी सुपूर्द

Amit Kulkarni

15 दिवस झाले तरी अद्याप चौकशी अपूर्णच

Amit Kulkarni
error: Content is protected !!