तरुण भारत

जापनीज व भारतीय लष्कराचे संयुक्त प्रशिक्षण

प्रतिनिधी /बेळगाव

जापनीज व भारतीय लष्करामध्ये तीन दिवसीय संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा लाईट इंन्फ्रट्री येथे हे प्रशिक्षण पार पडले. यानिमित्त विविध कवायती दोन्ही सैन्यांकडून संयुक्तरीत्या करण्यात आल्या.

Advertisements

व्यायाम धर्म रक्षक हे वार्षिक सराव प्रशिक्षण 2018 पासून आयोजित केले जात आहे. यावषी देखील या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतीक दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या सैन्यांनी विशेष कवायती केल्या. यामुळे दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध वाढणार आहेत. जापनीस सैन्याचे 5 वरी÷ अधिकारी व इतर सैनिक या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले आहेत. लेफ्टनंट कर्नल युझो मसुडा यांच्या नेतृत्वाखाली कवायती करण्यात आल्या.

मराठा लाईट इंन्फ्रट्रीच्या ट्रेनिंग ग्राऊंडसह ज्यूनिअर लिडर विंग व रोहिडेश्वर कॅम्प येथे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून जापनीस सैन्य पुन्हा माघारी गेले.

Related Stories

भारतनगर खासबाग येथील विवाहिता बेपत्ता

Patil_p

शहर स्वच्छतेचा बोजवारा

Amit Kulkarni

जितोच्या नूतन पदाधिकाऱयांचा पदग्रहण समारंभ

Amit Kulkarni

जिल्हा प्रशासन-विविध दलित संघटनांतर्फे कार्यक्रम

Amit Kulkarni

शेतकऱयांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Amit Kulkarni

भाजपचा सौंदत्ती तालुक्मयात रॅलीद्वारे जोरदार प्रचार

Amit Kulkarni
error: Content is protected !!