तरुण भारत

डॉ. शिवबसव महास्वामीजींचा रविवारपासून जयंती महोत्सव

प्रतिनिधी /बेळगाव

पूज्य. श्री डॉ. शिवबसव महास्वामी यांचा 121 वा जयंती महोत्सव दि. 5 ते 8 डिसेंबर दरम्यान आर. एन. शेट्टी पॉलीटेक्नीक येथे साजरा करण्यात येणार आहे. या सोहळय़ाला नागनूर रुद्राक्षीमठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामींचे मार्गदर्शन लाभले आहे.

Advertisements

दि. 5 रोजी सायंकाळी 5.30 वाजता अथणी येथील प्रभू चन्नबसव स्वामी लिखित महात्मर चरित्रामृत या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी धारवाडच्या मुरगा मठाचे मल्लिकार्जुन महास्वामी उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. व्ही. एस. माळी, म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू विलास करजीन्नी, बसवराज जगजंपी, सरजू काटकर, सागर बोरगल्ली व शंकर बागेवाडी उपस्थित राहणार आहेत. दि. 6, 7 रोजी सायंकाळी 5.30 वाजता विविध कार्यक्रम होणार असून बुधवार दि. 8 रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ. शिवबसव महास्वामींच्या पुतळय़ाचे अनावरण तसेच सेवारत्न पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी शिरीगेरी येथील डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामी तसेच डंबळ गदग येथील सिध्दराम महास्वामी उपस्थित राहणार आहेत. या शिवाय हालकेरी येथील बसवलिंग महास्वामी, केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ व गिरीश होसूर उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

31 मे पर्यंत जिल्हय़ात जमावबंदी

Patil_p

एपीएल रेशनकार्डला बीपीएलचा कलर

Amit Kulkarni

दहावी पुरवणी परीक्षेचे मूल्यमापन 7 ऑक्टोबरपासून

Patil_p

खासगी कुरिअरला पोस्टाची टक्कर

Amit Kulkarni

लक्ष्मीपूजनाची सर्वत्र धामधूम

Patil_p

वेफोरायझरच्या 125 यंत्रांचे निलजी येथे वितरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!