तरुण भारत

बेळगाव-बेंगळूर महामार्गावर होणार 60 ते 70 चार्जिंग स्टेशन्स

बेस्कॉमच्या सहकार्याने राज्यभरात स्टेशन्स उभारणार

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बेंगळूर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी (बेस्कॉम) इतर वीज वितरण कंपन्यांच्या सहकार्याने राज्यातील विविध भागांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. बेळगाव-बेंगळूर या महामार्गावर अंदाजे 60 ते 70 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारणार असल्याची माहिती बेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चोळण यांनी गुरुवारी बेंगळूर येथे दिली.

राजेंद्र चोळण यांनी बेंगळूर अपार्टमेंट फेडरेशनने (बीएएफ) आयोजित ई-वाहन मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सरकारी कार्यालयांमध्ये, बेंगळूर मेट्रो यासह शहरात इतर ठिकाणी 300 हून अधिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. महानगरपालिका, शॉपिंग मॉल्स, अपार्टमेंट व इतर सार्वजनिक ठिकाणी स्टेशन्स उभारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेस्कॉम व हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी (हेस्कॉम)च्या सहकार्याने बेळगाव-बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गावर 60 ते 70 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारले जाणार आहेत. यासाठी जागांची पाहणी करण्यात आल्याचे सांगितले. सध्या बेस्कॉमकडून त्यांच्या जागेमध्ये तसेच सरकारी जागांमध्ये स्टेशन उभारण्याचे काम हाती घेतले आहे. बेस्कॉमकडून बेंगळूर शहरात 70 ठिकाणी 136 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. यामध्ये अजून 140 नव्या जागांची भर घालण्यात आली आहे.

हेस्कॉमकडून जागांची निश्चिती

कोरोनापूर्वी 2019 मध्ये हेस्कॉमच्या तत्कालिन महाव्यवस्थापकांनी सात जिल्हय़ांमधील मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून चार्जिंग स्टेशनसाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना केल्या होत्या. एका स्टेशनसाठी अंदाजे 1 हजार चौरस फूट जागा आवश्यक आहे. ज्यामध्ये 6 चार्जिंग युनिट्स सामावून घेता येतील व 500 केव्हीए डीटीसीची व्यवस्था करता येईल.

बेळगावला 25 चार्जिंग स्टेशन्स होणार

महाव्यवस्थापकांच्या सूचनेनुसार मुख्य मार्गालगत जागांची पाहणी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी वाहनचालकांना सहजरित्या चार्जिंग करता येणार आहे. हुबळी व बेळगाव या दोन शहरांमध्ये प्रत्येकी 25 चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत. बागलकोट, विजापूर, गदग व हावेरी येथे 10 तर शिरसी व कारवार येथे 5 स्टेशन्स सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे लवकरच बेळगाव-हुबळी महामार्गावर चार्जिंग स्टेशन ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

Related Stories

विणकर व्यावसायिकांसाठी राखीव निधी ठेवा

Amit Kulkarni

गिजवणेचा युवक अपघातात ठार

Patil_p

व्यवसाय अन् नातेसंबंध यांची सरमिसळ नको!

Omkar B

स्वागत कमानीवरील मजकुरात बदल करण्याचा प्रयत्न उधळला

Amit Kulkarni

कर्नाटक : पिण्याच्या पाण्याचा प्रकल्पासाठी जागतिक बँकेची मदत

Abhijeet Shinde

मराठी जनतेवरील अन्याय दूर करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा

Patil_p
error: Content is protected !!