तरुण भारत

53 हजार विद्यार्थ्यांना मिळाले बसपास

प्रतिनिधी /बेळगाव

मागील दोन महिन्यांपासून बसपास प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 53 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण करण्यात आले. दरवषी शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की बसपास प्रक्रिया सुरू व्हायची. मात्र गतवर्षापासून शैक्षणिक वर्षाला उशिराने प्रारंभ होत असल्याने बसपास प्रक्रियेलादेखील उशिरा सुरुवात होत आहे. तसेच बसपास प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसपास मिळविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Advertisements

कोरोनामुळे मागील दोन वर्षे शैक्षणिक अभ्यासक्रम विस्कळीत झाला आहे. याबरोबरच शाळादेखील बऱयाच काळासाठी बंद राहिल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बसपास मिळविण्याकडे दुर्लक्ष केले. गतवषी केवळ मोजक्मयाच विद्यार्थ्यांनी बसपास मिळविले होते. मात्र यंदा ऑगस्टपासून शाळा-महाविद्यालये पूर्ववत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना बसपास आवश्यक बनला आहे. दरवषी बेळगाव विभागातून 76 हजारांहून अधिक विद्यार्थी बसपास काढतात. मात्र मागील वर्षापासून बसपास काढणाऱया विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. यंदा आतापर्यंत 53 हजार विद्यार्थ्यांच्या हातात बसपास मिळाले आहेत. गतवर्षापासून बसपास प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. विद्यार्थ्यांना बसपास मिळविण्यासाठी सेवासिंधू पोर्टलवर अर्ज करावा लागत आहे. अर्ज केलेली पावती शाळा-महाविद्यालयात देणे आवश्यक आहे. शाळा-महाविद्यालयांतून एकत्रित आलेले अर्ज बसपास विभागात छाननी केले जात आहेत. त्यानंतर शाळा प्रतिनिधींकडे बसपास दिले जात आहेत.  

Related Stories

सर्वच शाळांनी पूर्ण फी माफ करावी

Omkar B

त्या भेटीचा शहर म. ए. समितीशी कोणताही संबंध नाही

Patil_p

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी सुनीता मोहिते

Omkar B

पॅरा टेबलटेनिस स्पर्धेसाठी संजीव हम्मण्णावर फ्रान्सला रवाना

Amit Kulkarni

मोटारसायकल चोरीप्रकरणी युवकाला अटक

Omkar B

बेळगुंदी शिवारात वाघसदृश प्राणी दिसल्याने खळबळ

Patil_p
error: Content is protected !!