तरुण भारत

महानगरपालिकेचे महसूल निरीक्षक संभ्रमात

एकीकडे महसूल वसुलीचे उद्दिष्ट तर दुसरीकडे निरीक्षकांच्या बदलींचा आदेश

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

महापालिकेचा महसूल वाढविण्याबरोबरच कर चुकविणाऱया मालमत्ताधारकांचा शोध घेण्याचा आदेश आयुक्तांनी बजाविला आहे. तर दुसरीकडे महसूल निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. आयुक्तांच्या दोन्ही आदेशांमुळे महसूल निरीक्षक अडचणीत आले आहेत.

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे शासनाने निधी मंजूर केला नाही. तटपुंज्या अनुदानामुळे विकासकामे राबविणे अशक्मय बनले आहे. होर्डिंगसह विविध माध्यमातून मिळणारा महसूल बंद झाला आहे. परिणामी महापालिकेच्या खजिन्यात ठणठणाट आहे. त्यामुळे मालमत्ता करवसुलीची मोहीम राबविण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. महसूल वाढीसाठी कर चुकविणाऱया मालमत्ताधारकांचा शोध घेण्याची सूचना महसूल निरीक्षकांना केली आहे. तसेच डिसेंबरअखेरपर्यंत 100 टक्के करवसुली करण्याचे टार्गेट अधिकाऱयांना दिले आहे. त्याचप्रमाणे मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचीही सूचना केली आहे.

महापालिका आयुक्तांनी एकीकडे महसूल वसुलीची जबाबदारी देऊन डिसेंबरअखेरपर्यंत 100 टक्के करवसुलीचे उद्दिष्टपूर्ण करण्याचा आदेश बजावला आहे. तर दुसरीकडे महसूल निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचा आदेश बजावला आहे. काही नव्या महसूल निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने वॉर्डअंतर्गत निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नव्या वॉर्डची माहिती घेण्याबरोबरच उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल निरीक्षकांना धावपळ करावी लागणार आहे. अशातच बदलीचा आदेश जारी होऊन तीन दिवस उलटले तरीही महसूल निरीक्षकांकडे संबंधित वॉर्डमध्ये काम करण्याची जबाबदारी मिळाली नाही. त्यामुळे वसुलीचे उद्दिष्ट दिलेल्या वेळेत कसे पूर्ण करायचे? असा पेच महसूल निरीक्षकांसमोर निर्माण झाला आहे.

आयुक्तांनी दिलेला टार्गेटचा आदेश आणि बदलीच्या आदेशामुळे महसूल निरीक्षक अडचणीत आले आहेत. काही महसूल निरीक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यालयात हजर झाले आहेत. पण रुजू होण्यासाठी वरिष्ट अधिकाऱयांकडून हिरवा कंदील मिळाला नसल्याचे समजते. आयुक्तांच्या सूचनेनुसार वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.

Related Stories

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यावर कार्यशाळा

Rohan_P

पाडव्याच्या पूर्वसंध्येला बाजारात तोबा गर्दी

Amit Kulkarni

क्वारंटाईन न होता घर गाठलेल्यांचा घेतला शोध

Patil_p

बागलकोट जिल्हय़ात सोमवारी एकाच दिवशी कोरोनाबाधित 33 रुग्ण

Patil_p

अन्नोत्सवात खवय्यांची गर्दी

Patil_p

महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज महामोर्चा

Amit Kulkarni
error: Content is protected !!