तरुण भारत

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा मुले जखमी

शहर, उपनगरांमध्ये कुत्र्यांचा उपद्रव वाढला

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा मुले जखमी झाली आहेत. शुक्रवारी दुपारी लक्ष्मी टेकडी, विनायकनगर, हनुमाननगर, विजयनगर परिसरात या घटना घडल्या. यापैकी चार मुलांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. तर दोन मुलांवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले.

शहर व उपनगरांमध्ये भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यासंबंधी अनेक संघटनांनी मनपाकडे तक्रारीही केल्या आहेत. शुक्रवारी उपनगरांतील चार मुली व दोन मुले कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाली आहेत. प्रशासनाने त्वरित भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या  कुत्र्यांना मारता येत नाही. त्यांना पकडून जंगलातही सोडता येत नाही. अशा परिस्थितीत नेमके काय करायचे? असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. मनपा व स्मार्टसिटी यंत्रणेने भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी केली जात आहे.

Related Stories

पाईप बदलण्याच्या बहाण्याने गंडविणारी टोळी सक्रिय

Amit Kulkarni

सेलडीडविषयी आज बेळगाव येथे सुनावणी

Patil_p

इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग

Patil_p

कर्नाटक एसएसएलसीचा निकाल सोमवारी जाहीर होणार: शिक्षणमंत्री

Abhijeet Shinde

बेंगळूर हिंसाचार प्रकरणी नगरसेविका इर्शाद बेगम यांच्या पतीला अटक

Abhijeet Shinde

जुना धारवाडरोडचे काँक्रिटीकरण अर्धवट

Patil_p
error: Content is protected !!