तरुण भारत

खोची येथील घटनेतील आरोपीविरोधात २२२ पानाचे दोषारोपपत्र दाखल

आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी वडगाव पोलिसांनी गोळा केले सबळ पुरावे, पंचावन्न साक्षीदाराकडे तपास

पेठ वडगाव, खोची/प्रतिनिधी

Advertisements

खोची (ता.हातकणंगले) येथील सहा वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारून माणुसकीला काळिमा फासल्याच्या घटनेने राज्यभर तीव्र संताप व्यक्त झाला होता. या प्रकरणी नराधम आरोपी बंडा उर्फ प्रदीप दिलीप पोवार याला वडगाव पोलिसांनी अटक करून त्याला कडक शिक्षा व्हावी यासाठी त्याचेविरोधात एक महिन्यात सबळ पुरावे गोळा करून पंचावन्न साक्षीदाराकडे तपास केला. तपास गतीने करून एक महिन्यातच आरोपीवर २२२ पानाचे दोषारोपपत्र वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले.

या प्रकरणी माहिती अशी की, खोची (ता.हातकणंगले) येथील सहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करुन गळा दाबून खुन केल्याची घटना 31 ऑक्टोंबर रोजी घडली होती. या प्रकरणी आरोपी प्रदीप उर्फ बंडा पोवार (रा.खोची) यास तात्काळ जेरबंद करुन लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शन व आदेशाप्रमाणे लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने तपास करुन एक महिन्यात चार्जशीट दाखल केली आहे.

या प्रकरणात बंडा पोवार या आरोपीस ताब्यात घेवून तत्काळ अटक करून त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास करून त्याचेविरुद्ध भौतिक व वैज्ञानिक पुरावे गोळा करून ५५ साक्षीदाराकडे तपास केला. यामध्ये आरोपी पोवार याच्याविरोधात जास्तीत जास्त व सबळ पुरावे गोळा करून जिल्हा व सत्र न्यायालयात एक महिन्यात २२२ पानाचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केला.

गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, जयश्री गायकवाड, डीवायएसपी रामेश्वर वैंजणे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोलीस अंमलदार रणवीर जाधव, संदीप गायकवाड, दादासो माने, योगेश राक्षे, प्रमोद चव्हाण, विकास घस्ते, आशिष शेलार, पो.हे.कॉ. राजेंद्र पाटील, महिला पोलीस अंमलदार सुगंधा लाड यांनी केला आहे. तसेच या तपासासाठी पोलिसांना खोची ग्रामस्थांनी बहुमोल सहकार्य केले आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Related Stories

कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मिळाला मुहूर्त

Abhijeet Shinde

पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना दरमहा नियमित धान्य मिळावे

Abhijeet Shinde

नांदणीतील पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : साळोखेनगर येथे चोरट्यांचा धुमाकूळ

Sumit Tambekar

कोल्हापूर : पणुत्रेच्या सरपंचानी साहित्य खरेदीत केला भ्रष्टाचार : सरदार पाटील यांचा आरोप

Abhijeet Shinde

शिक्षकांचे बाह्य मूल्यमापन थांबवा अन्यथा आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!