तरुण भारत

कर्नाटकातील फास्टर बोटी राज्याच्या हद्दीत

स्पीडबोट नसल्याचे कारण पुढे करत अधिकाऱ्यांनी हात झटकले, मासेमार आंदोलनाच्या पवित्र्यात

दापोली/प्रतिनिधी

Advertisements

महाराष्ट्रामध्ये वादळी वारा व पाऊस पावसाच्या पार्श्वभूमीवर मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. यामुळे कोकणातील सर्व नौका सध्या सुरक्षित बंदरांमध्ये व खाड्यांमध्ये विसावल्या आहेत. याचा गैरफायदा घेत कर्नाटक राज्यातील फास्टर नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत व हर्णे समुद्रात धुमाकूळ घालत आहेत. त्यांना तात्काळ अटकाव करण्यात आला नाही तर येथील कोळी बांधव पेटून उठेल व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दापोली पंचायत समितीचे माजी सभापती रउफ हजवानी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिला आहे.

ते म्हणाले की त्यांना रोखणे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हे शासनाचे काम आहे. आम्ही शासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनात ही गोष्ट आणून दिलेली आहे. तरीदेखील आपल्याकडे स्पीड बोटी नसल्याचे कारण पुढे करत शासकीय अधिकाऱ्यांनी हात झटकले आहेत. याचा आपण तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत.

शासनाने परराज्यातील या बोटींना तात्काळ अटकाव केला नाही व त्यांच्यावर कडक कारवाई केली नाही तर कोकणातील मासेमारी हा पेटून उठेल व भर समुद्रात संघर्षाचे वातावरण निर्माण होईल असा इशारा देखील हजवानी यांनी तरुण भारतशी बोलताना दिला आहे. आता बेकायदेशीरपणे अरबी समुद्रात मासेमारी करणाऱ्या या बोटींवर शासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

६० लाखांची रोकड लूटप्रकरण : मुख्य सूत्रधारासह अन्य दोन साथीदार अखेर गजाआड

Abhijeet Shinde

थर्टी फर्स्टच्या रात्री आसामचे मुख्यमंत्रीच उतरले रस्त्यावर

Abhijeet Shinde

1 मे पासून जवळपास 42 लाख प्रवासी श्रमिकांना भारतीय रेल्वेने पोहोचवले त्यांच्या घरी

Rohan_P

योगेश गौडा हत्या प्रकरण : कर्नाटक हायकोर्टाने माजी मंत्री विनय कुलकर्णीचा जामीन नाकारला

Abhijeet Shinde

लव्ह आणि लँड जिहादविरोधात कायदा करणार

Patil_p

बेंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनला या वित्तीय वर्षात निव्वळ तोटा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!